Baramati Crime: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; रात्री आईसोबत भांडण करून घरातून बाहेर पडली अन्…

बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Baramati Crime: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; रात्री आईसोबत भांडण करून घरातून बाहेर पडली अन्…

बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवारांच्या पीएची 14 वर्षाची मुलगी विद्या प्रतिष्ठान येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकण घेत होती.

हेही वाचा- Pune Crime : नोकरीचं आमिष दाखवलं, लॉजमध्ये डांबलं अन्…; शिरुरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं होत. त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली.

मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे. घटनेचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत असून, अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत आमदार रोहित पवार देखील बारामती घटनास्थळी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात थोड्या वेळातच दाखल झाले असून पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्याकडुन रोहित पवार माहिती घेत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number