नवी दिल्ली: देशातील सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'संसदरत्न पुरस्कार 2025' सोहळ्याचे वितरण करण्यात आले आहे. यंदा देशातील 17 खासदारांना 'संसदरत्न पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी महाराष्ट्राने संसदरत्न पुरस्कारांसाठी बाजी मारली आहे. नरेश म्हस्के आणि सुप्रिया सुळे यांच्यासह 7 खासदारांनी या यादीत स्थान मिळवले आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील 7 खासदारांना मिळाले संसदरत्न पुरस्कार:
1 - नरेश म्हस्के (शिवसेना - शिंदे गट),
2 - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट),
3 - श्रीरंग बारणे (शिवसेना - शिंदे गट),
4 - स्मिता वाघ (भाजप),
5 - अरविंद सावंत (शिवसेना - उद्धव ठाकरे गट),
6 - मेधा कुलकर्णी (भाजप),
7 - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस).
हेही वाचा: कारखाना चालवण्याची धमक असलेल्यांनाच मतदान करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आवाहन
संसदेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे देशभरातील काही खासदारांसह महाराष्ट्रातील या 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2010 मध्ये प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि 'प्रेझेंस' या ई-मॅगझिनने संसदरत्न पुरस्कारांची स्थापना केली होती. हा पुरस्कार मा. अब्दुल कलाम यांच्या सूचनेवरून करण्यात आला आहे. मे 2010 मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या समारंभाचे उद्घाटन स्वतः डॉ. कलाम यांनी केले होते. तेव्हापासून 125 हून अधिक पुरस्कार देण्यात आले आहेत. हा पुरस्कार भारतीय संसदेत उल्लेखनीय काम करणाऱ्या खासदारांना आणि संसदीय स्थायी समित्यांना दिला जातो. त्याची निवड पूर्णपणे लोकसभा आणि राज्यसभा सचिवालय आणि पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च यांनी दिलेल्या अधिकृत डेटावर आधारित आहे.