नवी दिल्ली: TMC खासदार महुआ मोईत्रा यांचे जर्मनीमध्ये थाटामाटात लग्न झाले. मोईत्रा यांनी बीजेडीचे नेता आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत एका खाजगी समारंभात लग्न केले. महुआ मोईत्रा यांनी तीन मे रोजी पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्न केले होते. पिनाकी हे बिजू जनता दलाकडून चार वेळा खासदार राहिले आहेत. ते 1996 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते 2009 ते 2019 पर्यंत खासदार होते.
हेही वाचा: मुंबई महापालिकेसाठी भाजपानं कसली कंबर; शेलारांच्या उपस्थितीत बैठक पार
महुआ आणि पिनाकी यांच्या लग्नाच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रात दोघांनी एकमेकांचे हात धरल्याचे दिसत आहे. यादरम्यान, महुआ यांनी सोनेरी आणि हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. मात्र, लग्नाबाबत दोघांकडूनही कोणतेही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही. आसाममध्ये जन्मलेल्या महुआ यांनी 12 ऑक्टोबर 1974 रोजी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. महुआ यांनी 2010 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये सहभागी झाले होते. तसेच, 2019 मध्ये महुआ मोईत्रा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2024 मध्येही त्या खासदार म्हणून निवडून आले. तिच्या प्रभावी भाषणांसाठी लोकप्रिय असलेल्या महुआ मोईत्रा कृष्णनगरमधून दोन वेळा खासदार राहिल्या आहेत.
हेही वाचा: 'सुपेकर-अमिताभ गुप्तांनी मिळून ...';सुपेकरांवर राजू शेट्टींचे गंभीर आरोप
कोण आहेत महुआ मोईत्रा यांचे 'पतीदेव'?
महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हे बीजेडीचे एक प्रभावी नेते आहेत. पिनाकी मिश्रा यांचा जन्म 1959 मध्ये झाला. तसेच, पिनाकी 1996 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. इतकंच नाही, तर त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रजेश किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला होता. पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आहेत. त्यांची जवळजवळ तीन दशकांची दीर्घ राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द आहे. ते अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्य देखील राहिले आहेत.