Baramati Byelection 2026 : ‘भाजपचा डाव थांबवण्यासाठी…’; काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी स्पष्ट केली सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यामागील भूमिका

काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे.

Baramati Byelection 2026 : ‘भाजपचा डाव थांबवण्यासाठी…’; काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी स्पष्ट केली सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यामागील भूमिका

Baramati Byelection 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आता काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे. “ही निवडणूक केवळ निवडणूक नसून सर्वसामान्यांच्या संघर्षाचा प्लॅटफॉर्म आहे,” अशा शब्दांत आकाश मोरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“जबाबदारीचे भान आणि संघर्षाची तयारी”
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना एड. आकाश मोरे म्हणाले की, “काँग्रेसने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बारामतीमध्ये आपण कोणाविरुद्ध लढतोय याची मला पूर्ण जाणीव आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणे ही आमची प्राथमिकता आहे. हा संघर्षाचा काळ आहे आणि आम्ही आमचे मुद्दे सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचवू.”

का नाकारली ‘बिनविरोध’ निवडणुकीची विनंती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार देऊन या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. यावर मोरे म्हणाले, “भाजपला जेव्हा स्वतःचा फायदा असतो, तेव्हाच त्यांना पोटनिवडणूक बिनविरोध हवी असते. पण लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. अजितदादांच्या निधनानंतर नक्की काय परिस्थिती निर्माण झाली, कुणाला जबाबदार धरले गेले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. लोकांसमोर सत्य येण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे आहे.”

शेतकरी, महागाई आणि आरक्षणाचे मुद्दे ऐरणीवर
प्रचाराच्या मुद्द्यांबाबत बोलताना मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. “अवकाळी पाऊस, गॅसची दरवाढ आणि शेतमालाला नसलेला भाव हे ज्वलंत प्रश्न आहेत. शहरी भागात शेतीचा माल महाग मिळतो, पण शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. तसेच, मराठा आरक्षणाचा संघर्ष असो वा धनगर समाजाची ST आरक्षणाची मागणी, भाजपने केवळ राजकारण साधण्याचे काम केले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर या सर्व घटकांना 100 टक्के न्याय देईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Karuna Munde: बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांविरुद्ध करुणा मुंडेंनी ठोकला शड्डू, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

ओबीसी फॅक्टर आणि बहुजन समाजाची साथ
बारामतीमध्ये काँग्रेसने ‘ओबीसी फॅक्टर’चा विचार करून मोरे यांना संधी दिली आहे. “भाजपचा डाव थांबवण्यासाठी आणि लोकांपुढे खरी परिस्थिती मांडण्यासाठी आम्ही विरोध करत आहोत. केवळ विजय संपादन करणे हाच आमचा हेतू नाही, तर सत्तेत बसलेल्या लोकांपर्यंत जनतेचे प्रश्न पोहोचवण्याचा हा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे,” असेही मोरे यांनी स्पष्ट केले. आता बारामतीची ही लढत सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे अशी रंगणार हे निश्चित झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number