Karuna Munde: बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांविरुद्ध करुणा मुंडेंनी ठोकला शड्डू, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली आहे.

Karuna Munde: बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांविरुद्ध करुणा मुंडेंनी ठोकला शड्डू, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Karuna Munde: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एक मोठी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली आहे. “बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही जिवंत राहावी, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे,” असे करुणा मुंडे यांनी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे बारामतीच्या रणांगणात आता चुरस निर्माण झाली आहे.

‘बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाहीची थट्टा’
गेल्या काही दिवसांपासून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर कडाडून टीका करत करुणा मुंडे म्हणाल्या, “गेल्या 10 दिवसांपासून मी बिनविरोध निवडणुकीच्या गप्पा ऐकत आहे. पण लोकशाहीत मतदारांना निवडीसाठी चॉईस (पर्याय) असायला हवा. कोणत्याही मोठ्या पक्षाने किंवा तगड्या उमेदवाराने अजून धाडस दाखवले नाही, म्हणून मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर आले आहे. निवडणूक झालीच पाहिजे, तरच प्रजातंत्र वाचेल.”

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन
करुणा मुंडे यांनी केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. “आज महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कोणीही वाली उरलेला नाही. मंत्री, आमदार किंवा मुख्यमंत्री कोणीही त्यांना न्याय देत नाहीत. मोठे उद्योगपती अदानी-अंबानींचे भले केले जात आहे, पण शेतकऱ्यांचा सातबारा मात्र तसाच आहे. माझा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे हाच असेल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

600 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी आणि खाजगीकरणाचा मुद्दा
बारामतीमधील स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवताना त्यांनी साखर कारखानदारी आणि पाणी प्रश्नाचा उल्लेख केला. विशेषतः नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा त्यांनी आक्रमकरीत्या मांडला. “बारामतीत 600 महिला कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. हे कर्मचारी गेल्या 5 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत होते. सध्या सुरू असलेले हे खाजगीकरण गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय आणणारे आहे आणि या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Sunetra Pawar: ‘बारामती म्हणजे दादांचा श्वास…’, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषणादरम्यान भावूक

“लोकांनी संधी दिली तर सोनं करेन”
आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना करुणा मुंडे यांनी देवावर आणि जनतेवर विश्वास असल्याचे सांगितले. “मी केवळ बारामतीचे मुद्दे घेऊन लढत नाहीये, तर संपूर्ण राज्यातील अन्यायाविरुद्ध हा माझा लढा आहे. बारामतीमधील सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. जर मतदारांनी मला संधी दिली, तर त्या संधीचे सोनं करून मी गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करेन,” असे भावनिक आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number