Uday Samant: ‘…म्हणून अशी वक्तव्ये केली जातात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ दाव्यावर उदय सामंत यांचा टोला

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Uday Samant: ‘…म्हणून अशी वक्तव्ये केली जातात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ दाव्यावर उदय सामंत यांचा टोला

Uday Samant Criticizes Prithviraj Chavan: भाजपाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचा काय होता दावा?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमादरम्यान मोठा राजकीय गौप्यस्फोट करत सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ‘मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली होती आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या प्रवेशाला मान्यता दिली होती. पक्षप्रवेशाच्या बदल्यात गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्रिपदाची मागणी केली होती,’ असा दावा चव्हाणांनी केला.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, ‘तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न विचारता मी सोनिया गांधींच्या संमतीने होकार दिला होता. मात्र, नंतर मनमोहन सिंग यांनी ‘विरोधी पक्षातील नेत्याला मंत्री बनवणे म्हणजे लाच दिल्यासारखे होईल’ असे स्पष्ट करत या मागणीस नकार दिला. त्यामुळे मुंडे यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही.’

हेही वाचा – Manoj Jarange Patil : “29 च्या आंदोलनात सुट्टी नाही” प्रकृती अस्वस्थ असानाही जरांगेंचे मोठे आवाहन, म्हणाले…

उदय सामंत यांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. सामंत म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत. मविआच्या काळातही त्यांच्या वक्तव्यांकडे त्यांच्या स्वतःच्याच पक्षाने फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे अशा वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही.’

सुधीर मुनगंटीवार यांचीही कडक टीका
दुसरीकडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. ‘एका दिवंगत नेत्याच्या निष्ठेवर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि दावे करणे पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अजिबात शोभत नाही,’ अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – Rohit Pawar: ‘तुकाराम मुंढेंना ड्रग्ज विरोधी पथकाचे…’; रोहित पवारांनी फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number