‘उद्धव ठाकरे राजकारणातला टाइमपास!’ प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘जे घर सांभाळू शकले नाहीत ते…’

दसरा मेळाव्यातील भाषणावरून प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विकासाच्या मुद्द्यांसह ठाकरेंच्या नेतृत्वावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
Pravin Darekar
Pravin Darekar

दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजकीय नेतृत्वावरच निशाणा साधला. सरकारच्या कामांवर ठोस मुद्दे मांडण्याऐवजी विरोधक केवळ टीका करत असल्याचा दावा त्यांनी केला.

ठाकरेंच्या टीकेवर दरेकरांचा आक्षेप

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारला लक्ष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी ठाकरेंच्या भाषणावर आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार टीका केली जात असली, तरी विकासाच्या मुद्द्यांवर विरोधकांकडून ठोस भूमिका मांडली जात नसल्याचे ते म्हणाले. सरकारच्या निर्णयांमधील त्रुटी दाखवून देण्याऐवजी इतर विषयांवरून राजकीय वातावरण तापवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचवेळी दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘राजकारणातला टाइमपास’ आणि ‘टिकोजी राव’ अशा शब्दांचा वापर केला.

पक्षातील फुटीवरूनही साधला निशाणा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना दरेकर यांनी शिवसेनेतील फुटीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षातील आमदारांनी साथ सोडल्याचा संदर्भ देत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वतःच्या पक्षातील नेते आणि आमदारांना एकत्र ठेवता आले नाही, तर मोठे राजकीय बदल घडवण्याच्या दाव्यांना काय अर्थ, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, राज्यातील गुन्हेगारी घटनांवरूनही दरेकर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. गुन्ह्यात सहभागी असलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली, तरी तिच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version