संरक्षक मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात

देशाची राजधानी दिल्लीतील संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत विविध राजकीय नेत्यांची बैठक सुरू आहे. हा दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.

संरक्षक मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात

दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात जनआक्रोश पाहायला मिळत आहे. या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी दिल्लीतील संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत विविध राजकीय नेत्यांची बैठक सुरू आहे. हा दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात यावे, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे केंद्र सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आले असून गुरुवारी, दिल्लीतील संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत विविध राजकीय नेत्यांची सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. ही महत्त्वाची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार राहुल गांधी देखील उपस्थित आहेत.

हेही वाचा: प्रत्येक अतिरेक्याला शोधून ठेचणार; पंतप्रधान मोदी बिहारमध्ये गरजले
 

या बैठकीपूर्वी वेगळी बैठक पार

सर्वपक्षीय बैठक होण्यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची वेगळी बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर सर्वपक्षीय बैठकीची सुरूवात झाली. या बैठकीला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. मात्र, शिवसेना पक्षातून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकही खासदार सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number