रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच; महेंद्र दळवी आणि अनिकेत तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक

टीका झाली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना दिला आहे.
aniket tatkare, mahendra dalvi
aniket tatkare, mahendra dalvi

रायगड : रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये अजूनही खटके उडत असून आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकासकामांच्या श्रेयावरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होतं. आपण निधी दिलेला असताना त्याचं उद्घाटन तटकरेंनी केलं, त्या कार्यक्रमाला सुद्धा बोलावलं नसल्याचा आरोप आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला होता. त्याला आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका आल्या की तटकरे यांच्या पायाशी येतात, निवडणूक संपली की कोण तटकरे? असं विचारू लागतात. आमची जर मतदारसंघात ताकद नसेल तर आमच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोकांच्या विकासकामांकडे लक्ष द्या, असा सल्ला अनिकेत तटकरेंनी दळवींना दिला. आमचं काम ‘हाथी चाले बाजार…’, या पद्धतीने सुरू असतं, असंही ते म्हणाले. यापुढे टीका झाली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही अनिकेत तटकरे यांनी दिला आहे.

हेही वाचा : अमरावती शिक्षण विभाग मतदारसंघात पुणे पॅटर्न राबवणार? शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता; उमेदवारीवरून भाजपमध्ये सस्पेन्स कायम

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version