Bihar Election 2025 Results: बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीला वेग आला असून विविध मतदारसंघांतील ट्रेंड्स समोर येत आहेत. मात्र, अंदाज आणि ट्रेंड्सपेक्षा अधिकृत निकाल पाहू इच्छिणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अधिकृत निकाल कुठे पाहायचे?
बिहार निवडणुकीचे संपूर्ण निकाल, मतांची संख्या, मतदारसंघनिहाय आघाड्या अशी सर्व माहिती तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
अधिकृत निकालांची लिंक:
https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2025/index.htm
या पोर्टलवर तुम्ही प्रत्येक जागेचा तपशील, उमेदवारांना मिळालेले मतांचे आकडे, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, मतदारसंघातील आघाडी-घट, पोटनिवडणुकांचे अधिकृत आकडे, अशी सर्व महत्वाची माहिती पाहू शकता. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर निकालांचा सविस्तर नकाशा उपलब्ध असून कोणत्या भागात कोणता पक्ष आघाडीवर आहे हे त्वरित दिसते. त्याचबरोबर पाय चार्टद्वारे जागांची विभागणी आणि मतांचे प्रमाण स्पष्टपणे दाखवले जाते.
हेही वाचा – Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये NDA पुढे; केला 150 चा टप्पा पार, BJP – JDU ने वाढवलं टेन्शन
मतमोजणीची व्यवस्था
दरम्यान, 243 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी राज्यातील 38 जिल्ह्यांतील 46 मतमोजणी केंद्रांवर सुरू आहे. सुरक्षेच्या आणि प्रशासनिक कारणांमुळे आज राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत 6 आणि 11 नोव्हेंबरला झाले होते. अधिकृत, अचूक आणि अद्ययावत निकाल पाहण्यासाठी मतदारांनी निवडणूक आयोगाच्या पोर्टललाच भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.