Saturday, February 08, 2025 02:34:42 PM

Mahayuti
महायुतीच्या खाते वाटपात कोणाचं पारड जड?

आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.

महायुतीच्या खाते वाटपात कोणाचं पारड जड

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळ विस्तारही झाला. मात्र अजूनही खातेवाटप झाले नाही. दोन दिवसांमध्ये खातेवाटप पूर्ण करण्याचा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.

गृह खाते, अर्थ खाते यावरून खाते वाटपाचा तिढा कायम होता. गृह खात्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता. पण भाजपाला बहुमत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहखात स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. त्याऐवजी नगरविकास, गृहनिर्माण आणि उद्योग खाते शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. तसेच अजित पवारांकडे राहणार अर्थ खात असल्याची सूत्रांची आहे.

भाजपाकडे गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा खाते असणार आहे. शिवसेनेकडे नगरविकास, गृहनिर्माण जाण्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ, महिला आणि बालविकास खाते जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात अगदी विधानसभा निवडणूक झाल्यापासून सत्ता वाटपाचा तिढा पाहायला मिळत आहे. महत्त्वाची खाती मिळावी यासाठी महायुतीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला होता आणि आता खाते वाटपाला विलंब होत आहे.

 

हेही वाचा... https://www.jaimaharashtranews.com/politics/what-was-discussed-in-the-meeting-between-uddhav-thackeray-and-fadnavis/32013

 

मंत्रिमंडळात भाजपाकडे जाणारी महत्त्वाची खाती

गृह

महसूल

सार्वजनिक बांधकाम

पर्यटन

ऊर्जा

 

मंत्रिमंडळात शिवसेनेकडे जाणारी महत्त्वाची खाती

नगरविकास

गृहनिर्माण

 

मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडे जाणारी महत्त्वाची खाती

अर्थ

महिला आणि बालविकास

 

 


सम्बन्धित सामग्री