यवतमाळ जिल्ह्यात 25 नव्याने पॉझेटिव्ह 23 जण कोरोनामुक्त; तीन रुग्णांचा मृत्यु…

यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात 24 तासात 25 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 56 वर्षीय पुरुष, झरीजामनी येथील 47 वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती […]

यवतमाळ जिल्ह्यात 25 नव्याने पॉझेटिव्ह 23 जण कोरोनामुक्त; तीन  रुग्णांचा मृत्यु…

यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात 24 तासात 25 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 56 वर्षीय पुरुष, झरीजामनी येथील 47 वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 23 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 325 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 25 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 300 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 344 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12530 झाली आहे. 24 तासात 23 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11789 आहे. तर जिल्ह्यात एकूण 397 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 122210 नमुने पाठविले असून यापैकी 121537 प्राप्त तर 673 अप्राप्त आहेत. तसेच 109007 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number