यवतमाळ तीन कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 50 नव्याने पॉझेटिव्ह 66 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यात 24 तासात 50 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 68 वर्षीय आणि 42 पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर […]

यवतमाळ तीन कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 50 नव्याने पॉझेटिव्ह 66 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यात 24 तासात 50 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 68 वर्षीय आणि 42 पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 257 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 50 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 207 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 428 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13634 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12789 आहे. तर जिल्ह्यात एकूण 417 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 132244 नमुने पाठविले असून यापैकी 131911 प्राप्त तर 333 अप्राप्त आहेत. तसेच 118277 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number