Bhimashankar Temple: 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिरात पुन्हा घुमणार ‘हर हर महादेव’चा गजर; ‘या’ तारखेपासून मंदिर दर्शनासाठी खुले, पण ‘हा’ नियम पाळावाच लागणार

भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर मंदिराबाबत लाखो शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Bhimashankar Temple: 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिरात पुन्हा घुमणार ‘हर हर महादेव’चा गजर; ‘या’ तारखेपासून मंदिर दर्शनासाठी खुले, पण ‘हा’ नियम पाळावाच लागणार

Bhimashankar Temple: भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर मंदिराबाबत लाखो शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून दर्शनासाठी बंद असलेले मंदिर अखेर 15 जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केल्यानंतर भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बांधकामामुळे दर्शन सेवा होती बंद

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून भीमाशंकर मंदिर परिसरात नवीन सभामंडप तसेच पायरी मार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या कामांमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ९ जानेवारीपासून मंदिरातील नियमित दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. आता बहुतांश काम पूर्णत्वाकडे पोहोचल्याने मंदिर प्रशासनाने दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दररोज मर्यादित भाविकांनाच मिळणार प्रवेश

मंदिर खुले होत असले तरी गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दररोज केवळ 1 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक राहणार असून वैध ऑनलाइन पासशिवाय गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही.

15 जूनपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य

मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपाचे काम 31 मेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दर्शन रांगांची व्यवस्था, परिसराची स्वच्छता आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित उर्वरित कामे 15 जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, दगड आणि यंत्रसामग्री हटवून संपूर्ण परिसर भाविकांसाठी खुला करण्यात येणार आहे. यासाठी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने 15 जूनची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

हेही वाचा – Weather Update : मुंबईसह उपनगरात सलग तीन दिवस पावसाची हजेरी; कोकणासह इतर भागासाठी हवामान विभागाचा मोठा इशारा

दर्शनाचा बेत असल्यास आधीच करा नोंदणी

भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांनी ऑनलाइन नोंदणी आणि पासची प्रक्रिया आधीच पूर्ण करून ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मंदिर पुन्हा सुरू होत असल्याने सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number