Chandra Grahan 2026 : यंदाच्या सालातील होळीचा सण एका विशेष खगोलीय आणि ज्योतिषीय घटनेचा साक्षीदार ठरणार आहे. यावर्षी 3 मार्च रोजी वर्षातील पहिले आणि सर्वात प्रदीर्घ चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम आणि सूतक काळ पाळला जाणार आहे. विशेष म्हणजे, हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागणार असल्याने काही राशींसाठी हा काळ सावधगिरीचा इशारा देणारा ठरणार आहे.
चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतक काळ
भारतीय पंचांगानुसार, हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी सुरू होईल. ग्रहणाचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
– ग्रहण प्रारंभ: दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी.
– ग्रहण समाप्ती: संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी.
– एकूण कालावधी: हे ग्रहण 3 तास 27 मिनिटे चालेल, जे या वर्षातील सर्वात प्रदीर्घ ग्रहण असेल.
– सूतक काळ: चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून सूतक लागेल. या काळात मंदिरे बंद राहतील आणि कोणतीही शुभ कार्ये किंवा पूजा केली जाणार नाही. रात्री ग्रहण सुटल्यानंतरच होळी प्रज्वलित केली जाईल.
सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात ग्रहण
हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह रास ही नेतृत्व आणि आत्मविश्वासाची प्रतीक आहे, तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सुख-सोयींशी संबंधित आहे. या नक्षत्रात ग्रहण लागल्यामुळे कला, मनोरंजन आणि चैनीच्या वस्तूंशी संबंधित क्षेत्रांत मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सिंह राशीत ग्रहण असल्याने या राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या आणि स्वभावातील चिडचिडेपणाच्या समस्या जाणवू शकतात.
हेही वाचा – Holi 2026: होळीला 4 ग्रहांची 'उलटी चाल'! राहु-केतूसह गुरु-बुध होणार वक्री; 'या' 3 राशींना धनलाभाची मोठी संधी
या 5 राशींनी रहावे सावध
ग्रहणामुळे निर्माण होणारी ऊर्जा काही राशींसाठी आव्हानात्मक ठरेल:
मेष रास: अनावश्यक खर्च वाढतील आणि धावपळ होईल. आर्थिक नियोजनात अडथळे येऊ शकतात.
कर्क रास: व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचार करा. प्रवासात आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.
सिंह रास: ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव तुमच्यावरच असेल. मानसिक तणाव, कौटुंबिक वाद आणि आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक रास: करिअरमध्ये नवीन आव्हाने उभी राहतील. या काळात कर्ज घेणे टाळावे, अन्यथा भविष्यात अडचण येऊ शकते.
मीन रास: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. यश मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
ग्रहणाचे धार्मिक नियम आणि होळी
होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने धार्मिक विधींबाबत संभ्रम असू शकतो. मात्र, ज्योतिष अभ्यासकांच्या मते, ग्रहण संध्याकाळी संपल्यानंतर आणि शुद्धीकरण झाल्यानंतरच होळी पेटवणे शास्त्रशुद्ध ठरेल. सूतक काळात अन्नामध्ये तुळशीची पाने टाकणे आणि ईश्वराचे ध्यान करणे हितकारक मानले जाते. या ग्रहणाचा जगाच्या राजकारणावर आणि नैसर्गिक स्थितीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)