Lalbaugcha Raja Visarjan 2026: उद्या लालबागच्या राजाचा निरोप सोहळा; विसर्जन मिरवणुकीची वेळ, मार्ग आणि A टू Z माहिती जाणून घ्या

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या लालबागचा राजा यांच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीसाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2026: उद्या लालबागच्या राजाचा निरोप सोहळा; विसर्जन मिरवणुकीची वेळ, मार्ग आणि A टू Z माहिती जाणून घ्या
Lalbaugcha Raja Visarjan

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या लालबागचा राजा यांच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीसाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे. लाखो गणेशभक्तांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला जाणार असून, यंदाही परंपरेप्रमाणे मुंबई पोलिसांना विशेष सलामी देत मिरवणूक पुढे सरकणार आहे.

दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे देशभरातील भक्तांचे लक्ष लागलेले असते. भक्ती, परंपरा आणि शिस्तीचा संगम असलेली ही मिरवणूक मुंबईच्या गणेशोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण मानली जाते.

सकाळपासून धार्मिक विधींना सुरुवात

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आणि उत्तरपूजा पार पडेल. या धार्मिक विधीनंतर भक्तांच्या जयघोषात दुपारी 12 वाजता लालबाग मार्केटमधून राजेशाही विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल.

मुंबई पोलिसांना विशेष मानवंदना

यंदाच्या मिरवणुकीत ‘माणूस उभा आहे वर्दीतला… म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला!’ या संदेशातून मुंबई पोलिसांना विशेष सलामी देण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे.

याशिवाय, मुंबई अग्निशमन दलाकडूनही सायरन वाजवत लालबागच्या राजाला मानवंदना अर्पण केली जाणार आहे. त्यामुळे मिरवणुकीत भक्तिभावाबरोबरच सुरक्षा यंत्रणांप्रती आदर व्यक्त करणारे वेगळे दृश्य पाहायला मिळणार आहे.

असा असेल विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईतील अनेक ऐतिहासिक भागांतून पुढे सरकणार आहे. मिरवणुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल:

  • लालबाग मार्केट

  • भारतमाता सिनेमा

  • भायखळा

  • हिंदुस्तान मस्जिद

  • दोन टाकी

  • कुंभारवाडा

  • माधव बाग

  • व्ही. पी. रोड

  • गिरगाव चौपाटी

या संपूर्ण मार्गावर लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटीवर होणार अंतिम निरोप

रात्रभर सुरू राहणाऱ्या या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अरबी समुद्रात विधिवत विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

गिरगाव चौपाटीवर अंतिम दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, विसर्जनाचा हा भावनिक क्षण पाहण्यासाठी मुंबईसह देशभरातून भक्त मोठ्या संख्येने येतात.

भक्तिभाव, परंपरा आणि शिस्तीचा संगम

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही केवळ धार्मिक परंपरा नसून मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि शिस्तबद्ध वातावरणात लाखो भक्त बाप्पाला निरोप देणार आहेत. यंदाही मुंबई पोलिसांना विशेष सलामी देत लालबागचा राजा भाविकांचा निरोप घेणार असल्याने ही मिरवणूक अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number