Festival Eco Ideas: पुजेची फुले वाया घालवू नका! ‘या’ फुलांपासून बनवा घरच्या घरी धूप-अगरबत्ती, जाणून घ्या सोपी पद्धत

 भारतामध्ये सण-उत्सवांच्या काळात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

Festival Eco Ideas: पुजेची फुले वाया घालवू नका! ‘या’ फुलांपासून बनवा घरच्या घरी धूप-अगरबत्ती, जाणून घ्या सोपी पद्धत

Festival Eco Ideas: भारतामध्ये सण-उत्सवांच्या काळात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. विशेषतः नवरात्रोत्सव, दिवाळी, गणेशोत्सव अशा धार्मिक प्रसंगांमध्ये झेंडूच्या फुलांना खास महत्त्व असते. पुजेसाठी ही फुले माळा, तोरणे, रांगोळ्या आणि देवीच्या सजावटीसाठी वापरली जातात. मात्र पूजा संपल्यानंतर ही फुले बहुतेक वेळा वाया जातात आणि थेट कचर्‍यात टाकली जातात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? हीच फुले तुम्ही उपयुक्त स्वरूपात पुन्हा वापरू शकता. घरच्या घरी धूप किंवा अगरबत्ती बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी असून पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे.

झेंडूच्या फुलांमध्ये नैसर्गिक सुगंध असतो. याशिवाय त्याचे औषधी गुणधर्म देखील आहेत. घरात झेंडूच्या फुलांपासून तयार केलेला धूप लावल्यास वातावरण सुगंधित होते, नकारात्मक उर्जा दूर होते आणि मनालाही शांती मिळते. त्यामुळे फुले वाया जाण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करणे अधिक चांगले ठरते.

धूप–अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी घरगुती स्वरूपाचे आहे. झेंडूच्या फुलांसोबतच गुलाबफुले, कापूर, तमालपत्र, लवंग, दालचिनी, चंदन पावडर, मध आणि तूप अशा वस्तूंची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी एकत्र केल्यावर त्यांना उन्हात नीट वाळवणे गरजेचे आहे. वाळल्यानंतर त्याची बारीक पूड करून घ्यावी. पावडर चाळून घेतल्यावर उरलेले मोठे कण पुन्हा वाटून घ्या, जेणेकरून मिश्रण एकसारखे होईल.

हेही वाचा: Homemade Shrikhand: सणासुदीच्या दिवशी घरच्या घरी बनवा स्वादिष्ट श्रीखंड; जाणून घ्या चक्का बनवण्याची सोपी पद्धत

आता या पावडरमध्ये थोडे मध, तूप किंवा हवे असल्यास तीळाचे तेल घालून मिसळा. यामुळे मिश्रण बांधले जाते. हे मिश्रण हव्या त्या आकारात – म्हणजे अगरबत्तीच्या काड्या किंवा छोटे धूपाचे गोळे – तयार करता येतात. तयार केलेले धूप उन्हात वाळवून घेतल्यावर ते वापरण्यास तयार होतात.

अशी अगरबत्ती केवळ सुगंध देत नाही, तर तिच्यामधील घटक आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, लवंग आणि दालचिनीमुळे हवेत जंतुनाशक गुणधर्म पसरतात. कापूर आणि चंदन पावडरमुळे घरात सकारात्मकता वाढते. तमालपत्र आणि गुलाबाच्या पाकळ्या वातावरण प्रसन्न ठेवतात.

आजच्या काळात बाजारातील अगरबत्त्यांमध्ये रासायनिक सुगंधी द्रव्यांचा मोठा वापर होतो, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण घरी झेंडूच्या फुलांपासून तयार केलेला धूप नैसर्गिक असल्याने तो सुरक्षित आहे. शिवाय, पूजेची फुले वाया न घालवता त्यांचा पुनर्वापर होतो, जे पर्यावरणपूरक आहे.

हेही वाचा: Anti-Aging Diet: सुरकुत्या, पिग्मेंटेशनला रामराम! त्वचेला तरुण ठेवणारे 'हे' 5 सुपरफूड्स नक्की ट्राय करा

म्हणून पुढच्या वेळी नवरात्र, दिवाळी किंवा कुठलाही धार्मिक सण साजरा करताना पूजेची फुले वाया घालवू नका. त्यांच्यापासून घरच्या घरी सुगंधित आणि आरोग्यदायी धूप–अगरबत्ती तयार करा. ही कृती केवळ घराला सुगंधित करणार नाही, तर तुमच्या श्रद्धेलाही एक नवा अर्थ देईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number