Monday, June 15, 2026 12:49:37 AM

May 2026 Pornima Shubh Yog : मे महिन्यात दुर्मीळ 'दुहेरी पौर्णिमा' योग; जाणून घ्या, 'फ्लॉवर मून' आणि 'ब्लू मून'चे ज्योतिष आणि खगोलशास्त्रीय महत्त्व

या एकाच कॅलेंडर महिन्यात दोन पौर्णिमा येत असून, असा योग दुर्मीळ मानला जातो. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, हा दुहेरी संयोग मानवी जीवनावर सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करणारा ठरेल.

may 2026 pornima shubh yog  मे महिन्यात दुर्मीळ दुहेरी पौर्णिमा योग जाणून घ्या फ्लॉवर मून आणि ब्लू मूनचे ज्योतिष आणि खगोलशास्त्रीय महत्त्व

Flower Moon and Blue Moon in May 2026 : मे 2026 हा महिना खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत खास ठरणार आहे. या एकाच कॅलेंडर महिन्यात दोन पौर्णिमा येत असून, असा योग दुर्मीळ मानला जातो. यातील पहिली पौर्णिमा 1 मे 2026 रोजी येत आहे. ही वैशाख पौर्णिमा किंवा बुद्धपौर्णिमा असेल. ही पौर्णिमा 'पुष्प पौर्णिमा' (Flower Moon) म्हणून देखील साजरी होईल. तर महिन्याच्या शेवटी म्हणजेच 31 मे 2026 रोजी 'नील चंद्र' अर्थात 'ब्लू मून' (Blue Moon) पाहायला मिळणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, हा दुहेरी संयोग मानवी जीवनावर सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करणारा ठरेल.

पुष्प पौर्णिमा: प्रगती आणि समृद्धीचा काळ
वैशाख शुद्ध पौर्णिमेला येणारी ही पौर्णिमा निसर्गाच्या बहराचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. हा काळ सुख-समृद्धीसाठी अत्यंत अनुकूल असून या दिवशी कोणते उपाय करणे लाभदायक ठरते, जाणून घेऊ..
चंद्राला अर्घ्य: रात्रीच्या वेळी चंद्राला दूध आणि पाण्याचे मिश्रण अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते.
वास्तू दोष निवारण: घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North−East) पांढरी सुवासिक फुले ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.
दानधर्म: गरिबांना पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ किंवा साखर दान करणे शुभ मानले जाते.

हेही वाचा - Vaishakh Pornima 2026 : वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या कृपेने 'या' राशींचे नशीब पालटणार; अडथळे दूर होऊन लाभेल आर्थिक आणि मानसिक स्थैर्य

नील चंद्र (Blue Moon): दुर्मिळ आध्यात्मिक ऊर्जा
जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला नील चंद्र  (Blue Moon) म्हटले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ 'अतिरिक्त ऊर्जा' देणारा असतो. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि मोठ्या इच्छांच्या पूर्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. 
- या दिवशी अंतर्ज्ञान (Intution) वाढवण्यासाठी चंद्राच्या प्रकाशात बसून ध्यान (Meditation) करणे फायदेशीर ठरते.
- काचेच्या भांड्यात पाणी भरून ते रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पाण्याने मुख्य दरवाजावर सिंचन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

यशप्राप्तीसाठी विशेष संकल्प
या दुर्मिळ योगाचा फायदा घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक विशेष उपाय सांगितला आहे. तुमची एखादी मोठी व्यावसायिक इच्छा किंवा वैयक्तिक ध्येय एका पांढऱ्या कागदावर निळ्या शाईने लिहून ते चंद्राला दाखवावे आणि नंतर सुरक्षित ठिकाणी ठेवावे. असे केल्याने त्या ध्येयपूर्तीसाठी ब्रह्मांडातील ऊर्जेचे सहाय्य मिळते, अशी मान्यता आहे. 31 मे चा हा नील चंद्र केवळ आकाशात चमकणार नाही, तर तुमच्या आयुष्यातही यशाचे नवे मार्ग उघडणारा ठरेल.

हेही वाचा - Vaishakh Purnima 2026 : वैशाख पौर्णिमेला दुर्मिळ 'सिद्धी योग'! जीवनातील संकटे दूर करण्यासाठी 'या' शुभ मुहूर्तावर करा दानधर्म 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री