Shweta Kove: गडचिरोलीच्या लेकीने जागतिक व्यासपीठावर फडकावला तिरंगा; श्वेता कोवेच्या पराक्रमाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील एका सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या श्वेता कोवे सध्या आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे.

Shweta Kove: गडचिरोलीच्या लेकीने जागतिक व्यासपीठावर फडकावला तिरंगा; श्वेता कोवेच्या पराक्रमाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Shweta Kove: दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे हिने पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई करत देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष दखल घेत श्वेताचे कौतुक केले आहे. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील एका सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या श्वेता कोवे सध्या आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. अत्यंत मर्यादित सोयीसुविधा, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा असूनही श्वेताने तिरंदाजीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah Viral Video : एका छोट्याशा कारणावरून बुमराह चाहत्यावर संतापला आणि फोन फेकला; एअरपोर्टवरील Viral Video

14 देशांच्या खेळाडूंशी केली स्पर्धा 

श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा हाकला. तसेच श्वेताच्या क्रीडा स्वप्नांना खंबीर पाठबळ दिले. आईच्या संघर्षाला आणि श्वेताच्या जिद्दीला आज आंतरराष्ट्रीय यशाची पावती मिळाली आहे. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल 14 देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने हे यश संपादन केले.

हेही वाचा – U19 Asia Cup 2025 : U-19 आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी सामना होणार?; सेमीफायनल्समध्ये ‘या’ चार संघांमध्ये लढत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत श्वेताच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘श्वेता कोवेचे यश दुर्गम भागातील असंख्य मुला-मुलींसाठी आशा, प्रेरणा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तिची जिद्द आणि परिश्रम निश्चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरतील.’ भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या श्वेतामध्ये देशासाठी मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे, हे तिच्या या कामगिरीतून स्पष्ट होते. गडचिरोलीच्या लेकीने मिळवलेले हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number