Devisha Shetty Baby Shower: T20 विश्वचषक विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या घरी हलणार पाळणा; देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता सूर्याच्या वैयक्तिक आयुष्यातूनही एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

Devisha Shetty Baby Shower: T20 विश्वचषक विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या घरी हलणार पाळणा; देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

Devisha Shetty Baby Shower: भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता सूर्याच्या वैयक्तिक आयुष्यातूनही एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सूर्यकुमार यादव लवकरच बाबा होणार असून त्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सूर्याची पत्नी देविशा शेट्टी हिच्या डोहाळेजेवणाच्या (Baby Shower) समारंभाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डोहाळेजेवणाचा शाही सोहळा
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांचा अतिशय सुंदर अंदाज पाहायला मिळत आहे. या खास कार्यक्रमासाठी सूर्याने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश सूट परिधान केला आहे, तर देविशा पारंपरिक साडीमध्ये अतिशय देखणी दिसत आहे. व्हिडिओत सूर्यकुमार आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहे. देविशा आपला ‘बेबी बंप’ आनंदाने मिरवताना दिसत असून, या जोडप्याच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या आयुष्यातील या नवीन वळणाचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

हेही वाचा – BCCI Naman Awards 2026: आज दिल्लीत रंगणार क्रिकेट ताऱ्यांचा मेळा; कुठे, कधी आणि कसं पाहायचं ‘नमन’ पुरस्कारांचं लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

कॉलेजपासून ते विश्वविजेतेपदापर्यंतची साथ
सूर्यकुमार आणि देविशाची प्रेमकहाणी ‘आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’ या महाविद्यालयापासून सुरू झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 2016 मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकले. देविशा ही मूळची दक्षिण भारतीय कुटुंबातील असून ती सूर्याच्या यशात नेहमीच एक भक्कम आधारस्तंभ ठरली आहे. मैदानावर सूर्याचा उत्साह वाढवण्यासाठी देविशा नेहमीच स्टेडियमवर उपस्थित असते. आता विश्वचषक विजयाचा आनंद आणि घरात येणारा नवीन पाहुणा अशा दुहेरी उत्साहात सूर्या आगामी IPL 2026 हंगामात पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number