ICC Fine: अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वे दौऱ्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली आहे. एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानला एक डाव आणि 73 धावांनी पराभव पत्करावा लागला, आणि त्यानंतर लगेचच आयसीसीने संपूर्ण संघावर दंड ठोठावला आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीचा कारवाईचा बडगा
हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने निर्धारित वेळेपेक्षा 5 षटके कमी टाकली, त्यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या फीच्या 25 टक्के दंडाची शिक्षा ठोठावली. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनी ही चूक मान्य केली असून, पुढील कोणतीही औपचारिक सुनावणी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - ICC Womens World Cup 2025: महिला विश्वचषकात भारताची चमक! न्यूझीलंडला मात देत सेमीफायनलमध्ये प्रवेश
झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय
या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या डावात केवळ 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने दमदार फलंदाजी करत 359 धावा उभारल्या आणि 232 धावांची मोठी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानचा फलंदाजी क्रम कोसळला आणि संघ 159 धावांवर सर्वबाद झाला. परिणामी, झिम्बाब्वेने एक डाव आणि 73 धावांनी विजय मिळवत तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी विजयाची नोंद केली.
हेही वाचा - Virat Kohli Duck Record: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद; कोहलीचा हा विक्रम ठरतोय चर्चेचा विषय...
टी20 मालिकेकडे लक्ष
या पराभवानंतर अफगाणिस्तान संघ आता पुढील मालिकेकडे वळणार आहे. 29 ऑक्टोबरपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार असून, सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवरच खेळवले जातील.