Ajit Agarkar: BCCI चा मोठा निर्णय; मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

मंडळाने आगरकर यांच्या कराराचे रीतसर नूतनीकरण केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने मिळवलेल्या यशाची पावतीच या मुदतवाढीच्या रूपाने मिळाली आहे.<br/>

Ajit Agarkar: BCCI चा मोठा निर्णय; मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगरकर यांचा कार्यकाळ या वर्षीच्या जून महिन्यात संपणार होता, मात्र तो आता थेट जून 2027 पर्यंत वाढवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून संघ निवड प्रक्रियेत सातत्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाने आगरकर यांच्या कराराचे रीतसर नूतनीकरण केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने मिळवलेल्या यशाची पावतीच या मुदतवाढीच्या रूपाने मिळाली आहे.

कामगिरीच्या जोरावर कराराचे नूतनीकरण
BCCI च्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांनी स्वतःहून कार्यकाळ वाढवून देण्याची कोणतीही विनंती केली नव्हती. निवड समिती प्रमुखाला जास्तीत जास्त 4 वर्षांपर्यंत काम करण्याची मुभा असते. आगरकर यांनी नेहमीच 'कामगिरीच्या आधारावर भविष्याचा निर्णय घ्यावा' अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियामधील बदलाचा काळ (Transition Period) अत्यंत सुरळीतपणे पार पडला. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य मेळ घालण्यासोबतच धाडसी निर्णय घेतल्यामुळे आगरकर यांच्यावर बोर्डाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.

आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडियाची सुवर्णभरारी
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या काळात भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात दबदबा निर्माण केला आहे. ऑक्टोबर 2023 ते मार्च 2026 या कालावधीत भारतीय संघाने सलग चार ICC स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापैकी टीम इंडियाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 अशा तीन मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावून इतिहास रचला. याशिवाय, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा – Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा नादच खुळा; चेन्नईच्या गोलंदाजांना तावातावाने धुतले; अवघ्या 15 चेंडूत ऐतिहासिक अर्धशतक

2027 च्या विश्वचषकाचे लक्ष्य
पुढील एकदिवसीय विश्वचषक 2027 च्या ऑक्टोबरमध्ये नियोजित आहे. निवड प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि संघाची बांधणी अधिक मजबूत व्हावी या उद्देशाने आगरकर यांचा कार्यकाळ जून 2027 पर्यंत वाढवण्यात आला असला, तरी विश्वचषकाचा मुख्य कालावधी लक्षात घेता यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत BCCI ने अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. आगरकर यांच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात भारतीय क्रिकेटला निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number