Vaibhav Suryavanshi: दुहेरी जबाबदारी…दुहेरी धमाका ! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव

बेनोनी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वैभवने केवळ कर्णधारपदाची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्फोटक शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले.

Vaibhav Suryavanshi: दुहेरी जबाबदारी…दुहेरी धमाका ! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव

Vaibhav Suryavanshi: भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात त्याने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. बेनोनी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वैभवने केवळ कर्णधारपदाची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्फोटक शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील एका मोठ्या ताऱ्याची मोहोर पुन्हा एकदा उमटली आहे.

केवळ 63 चेंडूत ठोकले शतक

वैभवने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. त्याने आपली फटकेबाजी सुरू ठेवत अवघ्या 63 चेंडूत शतकी टप्पा गाठला. या डावात त्याने 6 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार खेचले. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज त्याच्यासमोर हतबल दिसले आणि वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत आपली बॅट अजिंक्य ठेवली.

हेही वाचा – T20 World Cup: बांगलादेशला ICC चा सर्वात मोठा दणका; वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी भारताचाच रस्ता धरावा लागणार

सततची धमाकेदार कामगिरी

विशेष म्हणजे, दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यातही वैभवने आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क केले होते. त्या सामन्यात त्याने केवळ 19 चेंडूत अर्धशतक झळकावले होते आणि 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना 24 चेंडूत 68 धावा कुटल्या होत्या. त्या खेळीत त्याने 10 षटकार आणि 1 चौकार मारला होता. अवघ्या 14 वर्षांच्या वयात भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व करताना तो ज्या आत्मविश्वासाने खेळत आहे, ते भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक संकेत आहेत.

हेही वाचा – PV Sindhu: दुखापतीवर मात करत पीव्ही सिंधूची विजयी सलामी; मलेशिया ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

विक्रमी वाटचाल आणि क्रिकेट विश्वात दबदबा

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने शतक झळकावले, तर विजय हजारे ट्रॉफीत अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकून विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय इमर्जिंग आशिया कप, अंडर-19 आशिया कप आणि आयपीएलमध्येही त्याने शतकी खेळी करत क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्याने क्रिकेटच्या मैदानात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number