पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षात तीन तरुण क्रिकेटपटूंच्या मृत्युने सर्वांनाच धक्का बसला आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाण क्लबमधील तीन क्रिकेटपटू ठार झाले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळण्यास नकार दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनीही या क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि हल्ल्याचा निषेध केला. ICCचे चेअरपर्सन जय शहा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, शाह यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्या कृती मूर्खपणाच्या असल्याचे म्हटले. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, तीन अफगाण क्रिकेटपटू, कबीर आगा, सिबगतुल्ला आणि हारून यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे, ज्यांची स्वप्ने निरर्थक हिंसाचारामुळे भंग झाली".
हेही वाचा- Pakistan vs Afghanistan : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 6 ठार; रशीद खान संतापला, तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय!
पुढे त्यांनी लिहिले की, "अशा प्रतिभावान खेळाडूंचे निधन हे केवळ अफगाणिस्तान क्रिकेटसाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतासाठी एक दुःखद घटना आहे. या दुःखद काळात आपण सर्वजण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबत उभे आहोत."
हेही वाचा- Ashes Series 2025: अॅशेस मालिकेसाठी 'या' खेळाडूला मिळू शकते जबाबदारी; मुख्य निवडकर्त्याने दिले संकेत
या घटनेनंतर, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेत पाकिस्तानशी खेळण्यास तात्काळ नकार दिला. पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही टी-20 मालिकाही पाकिस्तानमध्ये होणार होती. अफगाणिस्तान बोर्डाच्या या कारवाईनंतर, सर्वांच्या नजरा आता आयसीसीकडे आहेत. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तान क्रिकेट संघावर बंदी घालण्याची मागणी आधीच करण्यात आली होती. आता, अफगाणिस्तानात तीन क्रिकेटपटूंच्या हत्येमुळे पाकिस्तानवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे.