Tuesday, November 18, 2025 10:36:15 PM

अबब! सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं उचललं 145 किलो वजन; दिल्ली कॉन्स्टेबलची वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी

दिल्ली पोलिसातील एका कॉन्स्टेबलने सात महिन्यांची गर्भवती असताना वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला.

अबब सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं उचललं 145 किलो वजन दिल्ली कॉन्स्टेबलची वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसातील एका कॉन्स्टेबलने सात महिन्यांची गर्भवती असताना वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. इतकेच नव्हे तर तिने चक्क 145 किलोग्रॅम वजन उचलून पदकही जिंकले. आंध्र प्रदेशात झालेल्या ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025-26 मध्ये जेव्हा दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल सोनिका यादवने व्यासपीठावर पाऊल ठेवले. तेव्हा कोणीही कल्पना केली नसेल की, ती इतिहास घडवणार आहे. लोकांना वाटले की, सोनिकाने जास्त वजन उचलण्यासाठी तिचा वर्ग बदलला आहे. पण जेव्हा तिने 145 किलो वजनाची डेडलिफ्ट केली, तेव्हा सोनिका सात महिन्यांची गर्भवती आहे यावर विश्वास ठेवणे कठिण झाले. मे महिन्यात जेव्हा तिला समजले की, ती आई होणार आहे, तेव्हा तिच्या पतीने विचार केला होता की ती जिममध्ये जाणे, प्रशिक्षण घेणे थांबवेल. पण सोनिकाने मनाशी ठरवले होते की, ती प्रशिक्षण सुरूच ठेवणार. 

हेही वाचा : Donald Trump: ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसची आकांक्षा? रिपब्लिकन पक्षामध्ये चर्चेला उधाण

सोनिकाने खुलासा केला की, तिने तिच्या गर्भधारणेदरम्यान वेटलिफ्टिंग सुरू ठेवले आहे. ती म्हणाली की, या धाडसामुळेच तिला चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकता आले. स्पर्धेत तिने स्क्वॅट्समध्ये 125 किलो, बेंच प्रेसमध्ये 80 किलो आणि नंतर डेडलिफ्टमध्ये 145 किलो वजन उचलले. सोनिकाने सांगितले की, तिने ऑनलाइन संशोधन केले होते, त्यात तिला आढळले की लुसी मार्टिन्स नावाच्या एका महिलेने तिच्या गरोदरपणात असेच काहीतरी केले होते. तिने इंस्टाग्रामवर लुसीशी संपर्क साधला होता. तिच्याकडून प्रशिक्षण टिप्स घेतल्या होत्या.

सुरुवातीला कोणालाही माहित नव्हते की, सोनिका गर्भवती आहे. तिने सैल कपडे घातले होते आणि बेंच प्रेसनंतर तिच्या पतीने तिला उठण्यास मदत केली. तेव्हाही लोकांना काहीही संशय आला नाही. पण जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा संपूर्ण स्टेडियम टाळ्यांचा कडकडाट झाला. इतर संघांच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन करण्यासाठी येऊन तिच्यासोबत फोटो काढले. सोनिका ही 2014 च्या बॅचची कॉन्स्टेबल आहे. सध्या ती कम्युनिटी पोलिसिंग सेलमध्ये तैनात आहे. यापूर्वी, तिने मजनू का टीला परिसरात बीट ऑफिसर म्हणून काम केले होते. जिथे तिने ड्रग्जच्या गैरवापराविरुद्ध कौतुकास्पद काम केले होते.

हेही वाचा : AGTF Arrested Jagga : यूएस-कॅनडा सीमेवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य ताब्यात; बिश्नोई गँगला मोठा धक्का

2022 मध्ये दिल्ली पोलीस आयुक्तांनी तिचा सन्मान केला होता. महिला दिनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही तिच्या कामगिरीची दखल घेतली होती. तिचे पती अंकुर बाना हे खासगी क्षेत्रात काम करतात. कोणताही धोका टाळण्यासाठी तिने प्रत्येक पावलावर तिच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याचे सोनिकाने सांगितले. सोनिकाचा खेळातील प्रवास कबड्डीपासून सुरू झाला, परंतु जिममध्ये वजन उचलण्यास सुरुवात केल्यावर तिला तिची खरी ताकद कळली. 2023 मध्ये, तिने दिल्ली राज्य पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि तेव्हापासून तिचा प्रवास सुरूच आहे.


सम्बन्धित सामग्री