Monday, December 15, 2025 11:04:58 PM

Ind vs Sa 1st Test : "कसोटी क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजली..." वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड

पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीवरून भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.

ind vs sa 1st test  quotकसोटी क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजलीquot वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड

कोलकाता येथे पार पडलेला दक्षिण आफ्रिक विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. यावेळी दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अवघ्या 1-0 अशी आघाडी घेतली. एवढचं नव्हे तर दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिंकला. या कसोटी मालिकेचा दुसरा सामना गुवाहाटी येथे 22 नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.

मात्र पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीवरून भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी कमी दर्जाच्या गोलंदाजांवर आणि खेळपट्टीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 124 धावांचे लक्ष्य भारताला पार करता आले नाही आणि तीन दिवसांतच 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

त्यांच्या मते अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे खेळाडूंच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. यावेळी त्यांनी त्यांच्या एक्स ट्वीटरवर पोस्ट करत म्हटलं की, "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट, दुसऱ्या दिवशीचा खेळ जवळजवळ संपला आहे. कसोटी क्रिकेटची किती थट्टा... कसोटी क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजली..."

हेही वाचा- IND Vs SA : ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकाचा विजयी डंका! टेम्बा बवुमाच्या अर्धशतकाने खेळाचा कल पलटला

हरभजन सिंग याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं की, "गेली कित्येक वर्षे अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर सामने होताना मी पाहत आलो आहे. कुणी विकेट घेतो, मोठा हिरो बनतो आणि सगळ्यांना वाटतं की सर्व काही ठीक आहे. पण हा ट्रेंड आजचा नाही, अनेक वर्षांपासून चालू आहे आणि माझ्या मते हा पूर्णपणे चुकीचा आहे. अशा पिचांमुळे खेळाडूंची प्रगती होत नाही. या प्रकारे खेळून तुम्ही कुठेच प्रगती करत नाही. एक क्रिकेटर म्हणून तुमची प्रगतीच होत नाही. आता या मुद्द्यावर विचार करण्याची वेळ आली आहे."

कोलकाता येथे पार पडलेला दक्षिण आफ्रिक विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. यावेळी दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अवघ्या 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध दणदणीत सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतासमोर 124 धावांचं लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेने दिलेले आव्हान पुर्ण करण्याच्या प्रयत्नात भारताने दुसऱ्या डावात 100 धावा देखील केल्या नाही. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिंकला. 


सम्बन्धित सामग्री