भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय निवड समितीत एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. भारताचे माजी यशस्वी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या नवीन निवड समितीचे अध्यक्ष (मुख्य निवडकर्ता) म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय व कसोटी क्रिकेटमधील त्यांचा दांडगा अनुभव विचारात घेऊन बीसीसीआयने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. यापूर्वी मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या अजित आगरकर यांची जागा आता प्रज्ञान ओझा घेणार आहेत. यासोबतच भारताचे माजी क्रिकेटपटू रमेश पोवार यांचीही निवड समितीत नवीन सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
🚨 Announcement 🚨 Mr Ramesh Powar @imrameshpowar appointed to Men’s Selection Committee. Based on seniority (most Tests), Mr Pragyan Ojha @pragyanojha will chair the Committee. BCCI appreciates Mr Ajit Agarkar @imAagarkar for his commitment, conviction and contribution during his tenure as Chairman of the Committee. Details ▶️ https://t.co/z0jcyPWkr0 #TeamIndia — BCCI (@BCCI) October 19, 2026
मुलाखतींनंतर क्रिकेट सल्लागार समितीने केली नावांची निश्चिती
या नवीन सदस्याच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया बीसीसीआयच्या ‘क्रिकेट सल्लागार समिती’च्या (CAC) देखरेखीखाली अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची सखोल छाननी केली.
हेही वाचा – मुंबई इंडियन्सची धुरा पुन्हा रोहित शर्माकडे? नव्या प्रशिक्षकाचीही लवकरच घोषणा होणार
त्यानंतर मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात पार पडलेल्या अंतिम मुलाखतींच्या टप्प्यानंतर समितीने प्रज्ञान ओझा यांच्या नावावर मुख्य निवडकर्ता म्हणून आणि रमेश पोवार यांच्या नावावर नवीन सदस्य म्हणून शिक्कामोर्तब केले. या दोन्ही माजी खेळाडूंच्या समावेशामुळे भारतीय क्रिकेटच्या निवड प्रक्रियेला एक नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.