शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात यंदा मोठा बदल! यंदा सेलिब्रिटींचे कार्यक्रम रद्द, कारण काय?

महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर! नेस्को सेंटरमधील मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून दुष्काळग्रस्तांना मदत पाठवण्यावर भर दिला जाणार आहे

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात यंदा मोठा बदल! यंदा सेलिब्रिटींचे कार्यक्रम रद्द, कारण काय?
Eknath Shinde

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे सावट यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पाहायला मिळणार आहे. मुंबईतील नेस्को सेंटर येथे होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात यंदा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दरवर्षी दसरा मेळाव्यात सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन हे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थेट भाषणावर भर; अडीच तासांत मेळावा संपणार

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दरवर्षी राजकीय भाषणांसोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. विविध कलाकारांच्या सादरीकरणामुळे या मेळाव्याला वेगळी रंगत येते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्यात येणार आहे.

यंदाच्या मेळाव्यात कोणत्याही सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स होणार नसून, कार्यक्रमात थेट भाषणांवर भर दिला जाणार आहे. साधारण दोन ते अडीच तासांत संपूर्ण कार्यक्रम संपवण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याचे स्वरूप मागील वर्षांच्या तुलनेत वेगळे असणार आहे.

गेल्या वर्षी पूरग्रस्तांना मदत, यंदा दुष्काळग्रस्तांना आधार

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन न करता सामाजिक बांधिलकी जपण्यावरही शिवसेनेकडून भर दिला जात आहे. गेल्या वर्षी राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत पाठवण्यात आली होती. त्याच धर्तीवर यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, यंदा पूरस्थितीऐवजी दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राज्यातील दुष्काळी भागांमध्ये गरजू नागरिकांना मदत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून सामाजिक मदतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यंदाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून कोणते राजकीय मुद्दे मांडतात आणि राज्यातील सद्यस्थितीवर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number