कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत मोठी उलथापालथ; अरुण डोंगळे आणि नविद मुश्रीफ पिछाडीवर, महायुतीसमोर मोठे आव्हान

सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महायुतीचे काही उमेदवार आघाडीवर असले तरी, अरुण डोंगळे आणि नविद मुश्रीफ यांच्यासारख्या प्रमुख चेहऱ्यांची पीछेहाट झाल्यामुळे महायुतीच्या गोटात कमालीची चिंता पसरली आहे.

कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत मोठी उलथापालथ; अरुण डोंगळे आणि नविद मुश्रीफ पिछाडीवर, महायुतीसमोर मोठे आव्हान
gokul

Kolhapur Gokul Election Result: कोल्हापूरच्या सहकार वर्तुळाचे केंद्र असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय निकाल समोर येत आहेत. मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी आणि महायुती यांच्यात अत्यंत अटीतटीची व कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या चुरशीच्या लढतीत गोकुळचे माजी अध्यक्ष आणि महायुतीचे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले अरुण डोंगळे हे प्रचंड मतांनी पिछाडीवर पडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. डोंगळे यांच्यासह महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीचा सामना करावा लागत आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफही पिछाडीवर; शशिकांत खोत यांची आघाडी
ओबीसी राखीव गटातून महायुतीकडून उभे असलेले आणि गोकुळचे माजी अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ हे देखील पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओबीसी गटात नविद मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत खोत यांनी महत्त्वपूर्ण मताधिक्य मिळवत आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या मतदानापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्याबाबत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती, ज्याची चर्चा आता निकालादरम्यान पुन्हा एकदा रंगली आहे. याशिवाय राखीव गटातून महायुतीचा 1 उमेदवार आघाडीवर असून, समविचारी आघाडीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत.

हेही वाचा – ऐनवेळी भाजप प्रवेश नाकारल्यानंतर राहुल बोंद्रेंना पुन्हा एकदा पोलिसांच्या नोटिसा; ‘मी घाबरणार नाही, माझं कितीही नुकसान झालं तरी…’, बोंद्रेंची प्रतिक्रिया

सर्वसाधारण गटात महायुतीचे 12 तर समविचारी आघाडीचे 8 उमेदवार आघाडीवर
तिसऱ्या फेरीअखेर हातात आलेल्या आकडेवारीनुसार, सर्वसाधारण गटात महायुतीचे 12 उमेदवार आघाडीवर आहेत, तर समविचारी आघाडीचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, महायुतीचे प्रमुख नेते आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह विश्वास पाटील, अशोक चरटी, प्रताप पाटील कावणेकर, एस. आर. पाटील, अमर पाटील आणि कर्णसिंह गायकवाड हे दिग्गजांना फटके बसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, समविचारी आघाडीतर्फे शशिकांत पाटील-चुयेकर, विद्याधर गुरुकुबे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, राहुल देसाई आणि अभिजीत तायशेटे यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.

महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण; आगामी फेऱ्यांच्या निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महायुतीचे काही उमेदवार आघाडीवर असले तरी, अरुण डोंगळे आणि नविद मुश्रीफ यांच्यासारख्या प्रमुख चेहऱ्यांची पीछेहाट झाल्यामुळे महायुतीच्या गोटात कमालीची चिंता पसरली आहे. गोकुळ संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार राजकीय जोर-बैठका सुरू आहेत. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये राजकीय समिकरणात आणखी काय बदल होतात आणि अंतिम विजयाची गुलाल कोण उधळणार, याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! गोकुळ निवडणुकीचा आज निकाल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 32 टेबलांवर मतमोजणीला सुरूवात

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number