T20 World Cup 2026 Victory: IPL च्या रणधुमाळीपूर्वी विश्वविजेत्यांचा गौरव; BCCI कडून दिल्लीत ‘या’ दिवशी साजरा होणार विजयाचा महासोहळा

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियासाठी आता बीसीसीआयने (BCCI) एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

T20 World Cup 2026 Victory: IPL च्या रणधुमाळीपूर्वी विश्वविजेत्यांचा गौरव; BCCI कडून दिल्लीत ‘या’ दिवशी साजरा होणार विजयाचा महासोहळा

T20 World Cup 2026 Victory: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या दोन वर्षांत जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व गाजवत जवळपास सर्वच प्रमुख आयसीसी (ICC) जेतेपदे खिशात घातली आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियासाठी आता बीसीसीआयने (BCCI) एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा भव्य सोहळा 15 मार्च रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे.

केवळ पुरुषच नाही, तर महिला आणि युवा संघांचाही होणार सन्मान
बीसीसीआयने आखलेल्या या विशेष योजनेनुसार, केवळ टी-20 विश्वचषक विजेत्या संघालाच नव्हे, तर 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ, 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा महिला संघ आणि 19 वर्षांखालील पुरुष व महिला विश्वविजेत्या संघांनाही एकाच मंचावर सन्मानित केले जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, या ऐतिहासिक विजयांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकांनाही या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

आयपीएलच्या रणधुमाळीपूर्वी कर्णधारांची मांदियाळी
मार्च महिन्याच्या अखेरीस IPL 2026 चा नवा हंगाम सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 मार्च रोजी दिल्लीतच आयपीएलच्या सर्व 10 संघांच्या कर्णधारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सध्या बहुतांश आयपीएल संघांचे कर्णधार भारतीय खेळाडूच असल्याने, याच दिवशी त्यांचे अधिकृत फोटोशूट देखील केले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत कर्णधारांना आयपीएलच्या नवीन नियमांची सविस्तर माहिती दिली जाईल.

हेही वाचा – Harbhajan Singh: कीर्ती आझाद यांच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर हरभजन सिंग संतापला, म्हणाला 'श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे…'

15 मार्चला दिल्लीत क्रिकेटचा 'सुपर संडे'
बीसीसीआय 12 मार्च रोजी आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 मार्च हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत उत्साहाचा ठरणार आहे. एका बाजूला विश्वविजेत्यांचा गौरव सोहळा आणि दुसऱ्या बाजूला आयपीएलची पूर्वतयारी अशा दुहेरी कार्यक्रमांमुळे दिल्लीत क्रिकेटचा मोठा माहोल पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number