Hardik Pandya News: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या वर्षीच्या आयपीएल (IPL) दरम्यान दुखापतग्रस्त झालेला हार्दिक पांड्या आगामी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) च्या वैद्यकीय टीमच्या अहवालानुसार, तो आता थेट आगामी आयपीएल (IPL) मधूनच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.
🔴HARDIK PANDYA NEXT COMEBACK COULD BE ONLY IN IPL 2027🤯 – Hardik is recovering from a shin stress injury at BCCI’s Centre of Excellence in Bengaluru. – He could start jogging in 3 weeks, followed by 8 weeks of gradually increasing his running workload. – No timeline has been set for his full match fitness. – He is likely to miss the upcoming international series due to his recovery. – By then, domestic tournaments like the Syed Mushtaq Ali Trophy and Vijay Hazare Trophy will also be over. — Sam (@cricsam02) October 21, 2026
हार्दिक पांड्याच्या पायाच्या आतील पोटरीला दुखापत झाली आहे. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. 14 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध डॉ. दिनशा परडीवाला यांनी हार्दिकच्या वैद्यकीय अहवालाचे पुनरावलोकन केले. अहवालानुसार, हार्दिकला पूर्ण मॅच फिटनेस मिळण्यासाठी अजून कोणताही निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुखापतीवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून त्याचे स्ट्रेंथ ट्रेनिंग हळूहळू वाढवले जात आहे. पुढील 3 आठवड्यांनंतर तो पुन्हा जॉगिंग सुरू करू शकेल. त्यानंतरच्या 8 आठवड्यांत त्याच्या धावण्याचा भार हळूहळू वाढवला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेनुसार, 7 जानेवारीपर्यंत त्याच्या धावण्याचा भार टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल.
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 (आयसीसी वनडे वर्ल्ड कप): वनडे वर्ल्ड कप खेळताना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. यामुळे तो पहिल्या 5 सामन्यांनंतर थेट अंतिम सामन्यापर्यंतच्या सर्व सामन्यांना मुकला.
नोव्हेंबर-डिसेंबर 2023 (ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा): त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर 2023 ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा टी-20 सामन्यांच्या या मालिकेत तो खेळू शकला नाही, कारण तो घोट्याच्या दुखापतीतून सावरत होता
डिसेंबर 2023 – जानेवारी 2024 (भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा): टी-20 आणि वनडे या दोन्ही फॉरमॅटच्या मालिकांना तो मुकला. या काळातही त्याचे घोट्याच्या दुखापतीचे पुनर्वसन सुरू होते.
जानेवारी 2024- (अफगाणिस्तानचा भारत दौरा): टी-20 मालिकेदरम्यान तो खेळू शकला नाही, कारण त्याच्या घोट्याच्या दुखापतीतून बरे होण्याची प्रक्रिया सुरूच होती.
ऑक्टोबर 2026- सध्या (न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिका): वनडे आणि टी-20 फॉरमॅटच्या या आगामी मालिकांना तो मुकणार आहे, कारण त्याला पिढरीच्या अंतर्गत भागाला ताण पडल्यामुळे दुखापत झाली आहे.
दुखापतीच्या गांभीर्यामुळे हार्दिक पांड्या या वर्षी मैदानात उतरणे अत्यंत कठीण दिसत आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेला तो मुकण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतही तो खेळू शकणार नाही. तोपर्यंत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धाही संपलेल्या असतील.
भारतीय संघ 21 जानेवारी ते 3 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेट खेळत नसल्याने तो या मालिकेचा भाग नसेल. कसोटी मालिकेनंतर लगेचच इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचा फिटनेस पूर्णपणे सिद्ध झाल्यानंतर तो थेट आयपीएलमध्येच खेळताना दिसण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.