आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांची धडकी भरवणारी आणि मैदानावर आपल्या नेतृत्वाची छाप पाडणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर काल भावुक झालेली पाहायला मिळाली. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात रंगलेल्या T20 सामन्यात हरमनप्रीत कौरने 91 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, मुलाखतीदरम्यान तिला अश्रू अनावर झाले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिसरा सामना जिंकून भारताने मालिका जिंकली. हरमनप्रीतच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 216/7 अशी विशाल धावसंख्या उभारली. यानंतर तिने सुरुवातीला हसतमुखाने माध्यमांशी संवाद साधला. मात्र, जसजसा संवाद पुढे गेला, तसतसे तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले आणि तिला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. यावेळी तिने माईक बाजूला ठेवला आणि ती थेट पॅव्हेलियनकडे निघून गेली.
Harman’s emotions say what words never could. I need some time to gather myself. 💔💔💔 Thank you God for this 🙏 https://t.co/GMHOKKHmXR — Radhika Deshikachar (@sirfsapnadekho) October 20, 2026
हरमनप्रीतची दमदार खेळी
हरमनप्रीतने 41 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांसह 91 धावांची नाबाद खेळी केली. 221.95 च्या स्ट्राइक रेटने केलेल्या या खेळीने तिचे फलंदाजीतील कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले. मात्र, मुलाखतीच्या शेवटी तिच्या डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूंमुळे ती भावुक झाल्याचे स्पष्ट झाले.
हरमनप्रीत कौरची मैदानातील उत्कृष्ट कामगिरी आणि त्यानंतरची तिची भावूक मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या अश्रूंमागील नेमके कारण स्पष्ट नसल्याने त्याचा संबंध कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाशी जोडणे योग्य ठरणार नाही.