Rhabdomyolysis: भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आरोग्य संकटाचा खुलासा केला आहे. 22 वर्षीय मुंबई इंडियन्सच्या या स्टार फलंदाजाने सांगितले की पहिल्या IPL हंगामानंतर त्यांना 'रॅबडोमायोलिसिस' नावाचा एक दुर्मिळ आणि संभाव्य जीवघेणा स्नायू विकार झाला होता. गौरव कपूर यांच्या लोकप्रिय शो 'Breakfast With Champions' मध्ये तिलक वर्माने सांगितलं की, 'पहिल्या आयपीएलनंतर मला काही आरोग्य समस्या आल्या. मला तंदुरुस्त राहावे लागले. या गोष्टी बाहेर आलेल्या नाहीत. रॅबडोमायोलिसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये स्नायू तुटतात.' तथापी, तिलक वर्मा सांगितले की, हा काळ त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता, परंतु बीसीसीआय, सचिव जय शाह आणि मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमच्या मदतीने मी पूर्णपणे बरा झालो.
रॅबडोमायोलिसिस म्हणजे काय?
वैद्यकीय दृष्ट्या, रॅबडोमायोलिसिस (Rhabdomyolysis) ही एक दुर्मिळ पण गंभीर स्थिती आहे, ज्यात स्नायूंच्या ऊती वेगाने तुटतात आणि त्यातील मायोग्लोबिनसारखी विषारी प्रथिने रक्तात मिसळतात. ही विषारी प्रथिने मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकतात आणि त्वरित उपचार न झाल्यास जीवघेणी ठरू शकतात.
हेही वाचा - Michael Hussey On Sachin Tendulkar : 'लवकर संधी मिळाली असती तर सचिनपेक्षा 5000 जास्त धावा केल्या असत्या'; मायकल हसीचं वक्तव्य
रॅबडोमायोलिसिस कशामुळे होतो?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे 26 हजार प्रकरणे नोंदवली जातात. योग्य वेळी निदान आणि उपचार झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. तज्ञांच्या मते, या आजारामागे खालील कारणे सर्वाधिक आढळतात.
तीव्र व्यायाम किंवा पुनर्प्राप्तीशिवाय ओव्हरट्रेनिंग
उष्णतेचा जास्त सामना आणि निर्जलीकरण
अपघाती इजा, भाजणे किंवा स्नायू चिरडणे
काही औषधांचा (उदा. स्टॅटिन्स, अँटीडिप्रेसंट्स) दुष्परिणाम
अनुवांशिक स्नायू विकार किंवा दीर्घकाळ निष्क्रियता
रॅबडोमायोलिसिसची लक्षणे -
स्नायूंचा कमकुवतपणा
स्नायूंमध्ये वेदना
सूज
गडद रंगाचे (चहाच्या रंगाचे) मूत्र
हेही वाचा - India Women World Cup 2025: सेमीफायनलमध्ये भारताची संधी टिकवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक लढत
तथापी, इतर लक्षणांमध्ये निर्जलीकरण, मळमळ, लघवी कमी होणे किंवा अगदी बेशुद्ध होणे यांचा समावेश असू शकतो. स्नायूंना दुखापत झाल्यानंतर किंवा तीव्र शारीरिक ताणानंतर हे सामान्यतः एक ते तीन दिवसांनी दिसून येते, ज्यामुळे खेळाडू किंवा फिटनेस उत्साही लोकांमध्ये लवकर ओळखणे कठीण होते. तिलक वर्माच्या या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते की, फिटनेस आणि रीकव्हरी दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत.