Sunday, February 09, 2025 05:02:07 PM

ICC Test of the Year
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कसोटी संघात स्थान नाही

2024 आयसीसी पुरुष कसोटी संघ जाहीर

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कसोटी संघात स्थान नाही

मुंबई: आयसीसीने वार्षिक कसोटी संघ जाहीर केला आहे. 2024 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात समाविष्ट केले गेले आहे. या संघात 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा समावेश आयसीसीने '2024 टेस्ट टीम ऑफ द इयर'  मध्ये केला आहे. 

तसेच, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर २०२४ हा पुरस्कार जिंकणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या सन्मानासाठी जो रूट, ट्रॅव्हिस हेड आणि हॅरी ब्रूक हेही प्रमुख दावेदार होते, मात्र बुमराहने त्यांना मागे टाकले.

यापूर्वी हा पुरस्कार राहुल द्रविड (2004), सचिन तेंडुलकर (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2017, 2018) यांनी जिंकला आहे.


बुमराहच्या अपूर्व कामगिरीमुळे तो आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 900 गुणांचा टप्पा पार केला, जो भारतीय गोलंदाजांसाठी सर्वाधिक आहे. तसेच, त्याने 200 हून अधिक विकेट्स घेतल्या असून, त्याचा गोलंदाजी सरासरीचा दरही अद्वितीय आहे. त्याच्या कामगिरीसाठी आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारानेही त्याला गौरवण्यात आले.


ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. या मालिकेत त्याने पाच कसोटी सामन्यांत ३२ विकेट्स मिळवल्या. जरी भारताला मालिकेत १-३ अशी पराभवाची नामुष्की सहन करावी लागली, तरीही बुमराहच्या शानदार कामगिरीमुळे भारताने स्पर्धात्मक खेळ दाखवला.

आयसीसी पुरुष कसोटी संघ 2024

यशस्वी जैस्वाल (भारत), बेन डकेट (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), जो रूट (इंग्लंड), हॅरी ब्रूक (इंग्लंड), कामिंदू मेंडिस (श्रीलंका), जेमी स्मिथ (इंग्लंड) (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (भारत), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) (कर्णधार), मॅट हेन्री (न्यूझीलंड), जसप्रीत बुमराह (भारत).


सम्बन्धित सामग्री