IND vs WI 1st ODI : सात वर्ष क्रिकेटपासून लांब, पण एका संधीने बदललं सगळं! गिलने विश्वास दाखवला अन् मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मिळाली मोठी संधी

आजपासून केरळच्या तिरुवनंतपुरम येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याची सुरवात झाली आहे.

IND vs WI 1st ODI : सात वर्ष क्रिकेटपासून लांब, पण एका संधीने बदललं सगळं! गिलने विश्वास दाखवला अन् मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मिळाली मोठी संधी
IND vs WI 1st ODI Naman Dhir

आजपासून केरळच्या तिरुवनंतपुरम येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याची सुरवात झाली आहे. यावेळी कर्णधार शुभमन गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मॅचमध्ये टीम इंडियाने मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूला संधी दिली आहे. मुंबई इंडियन्सचा नमन धीर तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पदार्पण करत आहे.

कर्णधार शुभमन गिलने त्याला भारतीय संघाची कॅप प्रदान केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबसाठी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंजाबच्या 26 वर्षीय क्रिकेटपटूचा, तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात डेब्यू झाला आहे.

हेही वाचा- India vs Australia U19 Test: भारतीय संघाला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून न्यावे लागले रुग्णालयात

अंडर-16 स्तरावर पंजाबकडून खेळल्यानंतर, त्याला सहा-सात वर्षे कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळायला मिळाले नाही. नमन धीर हा भारतासाठी एकदिवसीय पदार्पण करणारा 264 वा आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 422 वा खेळाडू ठरला आहे. 2024 मधील त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात, त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या 28 बॉलमध्ये 62 धावांची वादळी खेळी करून आपली क्षमता दाखवून दिली.

शेर ए पंजाब स्पर्धेत नमन धीरने 216 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती. धीरने आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबसाठी केवळ 14 लिस्ट ए सामने खेळले असून, त्यात त्याने 39 च्या सरासरीने आणि १०६ च्या स्ट्राइक रेटने 357 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार अर्धशतके असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 आहे. त्याने आपल्या अनियोजित ऑफ-स्पिन गोलंदाजीने सात बळीही घेतले आहेत.

त्यामुळे तो लगेच शुभमन गिलच्या नजरेत आला. शुभमन गिल देखील हीच लीग खेळत होता. अशातच वादळी खेळी केल्यानंतर त्याला आठ दिवसाच टीम इंडियात सामील केलं गेलं. अंडर-25 स्पर्धेच्या कामगिरीने त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. रणजी ट्रॉफीनंतर, नमन धीरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number