India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; हॉकी विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघ जाहीर

दीर्घ प्रतीक्षेनंतर जागतिक मंचावर पात्र ठरलेला हा संघ अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या संयोजनासह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; हॉकी विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघ जाहीर

India vs Pakistan:  नेदरलँड्समधील ॲमस्टेलवीन आणि बेल्जियम येथे 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) 5 ऑगस्ट रोजी आपल्या 20 सदस्यीय संघाची आणि व्यवस्थापन समितीची घोषणा केली. दीर्घ प्रतीक्षेनंतर जागतिक मंचावर पात्र ठरलेला हा संघ अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या संयोजनासह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. या संपूर्ण स्पर्धेत जगभरातील चाहत्यांचे लक्ष 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्याकडे लागून राहिले आहे.

अम्माद बट यांच्याऐवजी अबू बकर यांच्याकडे कर्णधारपद
स्पर्धेच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी पाकिस्तान संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले. गेल्या 14 वर्षांपासून संघाचे नेतृत्व करणाऱ्या अनुभवी मिडफील्डर अम्माद बट यांना कर्णधारपदावरून हटवण्यात आले. PHF च्या 'प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटी'च्या शिफारशीनुसार 29 जुलै रोजी अबू बकर यांची नवीन कर्णधार म्हणून अधिकृत निवड करण्यात आली. अम्माद बट यांच्या प्रदीर्घ योगदानाचे कौतुक करत फेडरेशनने स्पष्ट केले की, ते संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून कायम राहतील. नव्या नेतृत्वाखालील हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर तगडे आव्हान उभे करेल असा विश्वास PHF ने व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा 20 सदस्यीय संघ आणि प्रशिक्षक वर्ग
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या 20 सदस्यीय संघात वकार, अली रझा (दोघे गोलकीपर), मुहम्मद अब्दुल्ला, मुहम्मद सुफियान खान, मोईन शकील, अब्दुल वाहिद अश्रफ राणा, अब्दुल हनान शाहिद, झकारिया हयात, अर्शद लियाकत, आदिल लतीफ, अहमद नदीम, गझनफर अली, इमाद शकील बट, मुहम्मद हम्मादुद्दीन अंजुम, रहमान अब्दुल, अफराज, उमर मुस्तफा, अबू बकर महमूद, अब्दुल मतीन आणि मुहम्मद इमाद यांचा समावेश आहे.

हेही वाचा – ODI World Cup 2027 : वनडे वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट; ICC कडून पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेदरलँड्सचे बॉब जोहान वेल्डहॉफ काम पाहणार असून, त्यांना ग्रेट ब्रिटनचे ख्रिस्तोफर जॉन बोवेन व अदनान झाकीर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून साथ देतील. टीम मॅनेजर म्हणून मुहम्मद ओवेस करनी आणि व्हिडिओ तंत्रज्ञ म्हणून अश्रफ सुलतान जबाबदारी सांभाळतील.

पूल D मधील सामने आणि भारत-पाक महासंग्राम
विश्वचषकात पाकिस्तानचा समावेश 'पूल D' मध्ये करण्यात आला असून याच गटात भारत, इंग्लंड आणि वेल्स हे संघ आहेत. पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी ॲमस्टेलवीन येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याने करेल, तर 17 ऑगस्ट रोजी त्यांचा सामना वेल्सशी होईल. यानंतर 19 ऑगस्ट रोजी हॉकी चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा महामुकाबला पाहायला मिळेल. नुकत्याच पार पडलेल्या 'आशियान लेजेंड्स लीग'नंतर आता जागतिक हॉकीच्या महामंचावर हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number