Wednesday, November 19, 2025 12:46:57 PM

IND vs AUS Semi Final: भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅच पावसामुळे रद्द झाल्यावर काय होईल?, जाणून घ्या नियम काय सांगतो

महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा उपांत्य सामना नवी मुंबईत खेळला जाणार आहे.

ind vs aus semi final भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅच पावसामुळे रद्द झाल्यावर काय होईल जाणून घ्या नियम काय सांगतो

ICC Women’s World Cup 2025 Semi Final: महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा उपांत्य सामना नवी मुंबईत खेळला जाणार आहे. पण सेमीफायनलवर पावसाचं सावट आहे, त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, जाणून घेऊया.

विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना म्हणजेच भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावरील 26 ऑक्टोबरला झालेला भारत आणि बांगलादेश यांच्यातील गट फेरीतील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता गट टप्प्यातील सामना रद्द झाल्यानंतर जर उपांत्य फेरीतही पाऊस पडला तर काय होईल, जाणून घेऊया.

हेही वाचा: Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझला खलिस्तानी संघटनेकडून धमक्या; KBC चा एपिसोड ठरला वादाचं कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी वाय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. त्या दिवशी नवी मुंबईतील हवामान पाहिलं तर 20 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. महिला विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर 30 ऑक्टोबरला पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. पण जर राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही तर गुणतालिकेत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल.

जर 30 ऑक्टोबरला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर तो 31 ऑक्टोबरला खेळवला जाईल. पण जर त्या दिवशीदेखील पाऊस झाला आणि सामना रद्द झाला, तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल, कारण गट टप्प्यात ती भारतापेक्षा वरच्या स्थानावर होती.

ऑस्ट्रेलिया हा महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेतील अपराजित संघ आहे, त्यांनी गट टप्प्यात एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने गट टप्प्यात सात सामने खेळले, त्यापैकी सहा सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरीकडे भारतीय संघाने 7 पैकी 3 सामने जिंकले आणि तीन सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. 


सम्बन्धित सामग्री