मुंबई: भारत आणि इंग्लंडमधील दुसरा एकदिवसीय सामना कट्टकच्या बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. भारत 22 वर्षांपासून या मैदानात सामना हरलेला नाही आहे. शेवटचा सामना भारत 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हरला होता.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ काही बदल करेल का ? यावर सर्वांचेच लक्ष आहे. विराट कोहली सामना खेळेल का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. जर विराट कोहली सामना खेळत असेल तर यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे.
विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला पहिल्या सामन्यात स्थान मिळाले होते. त्या संधीचं सोनं करत अय्यरने अर्धशतक झळकावले. त्यामुळे त्याला संघातून वगळणे अयोग्य ठरेल.
विराट कोहलीच्या येण्याने शुभमन गिल त्याच्या कायमच्या जागी म्हणजे सलामीला खेळताना दिसेल. भारतीय संघ गोलंदाजीत काही बदल करेल याचा शक्यता कमीच आहेत. हर्षित राणा आणि शमीने उत्तम गोलंदाजी केली होती. हर्षित राणाने त्याचा कामगिरीने भारतीय संघाला आणि चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
भारताच्या फिरकी गोलंदाजीची तिकडी म्हणजेच अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने इंग्लंड संघाला कमी धावत रोखण्यात सफल ठरले होते. त्यामुळे या कारणामुळे या सामन्यात खेळताना ते दिसणार आहेत
भारतीय संघ
संभाव्य प्लेयिंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव,अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी