Sunday, February 16, 2025 11:40:43 AM

Indian womens team for Ireland series
हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्म्रीती मंधाना सांभाळले कर्णधारपदाची धुरा

स्म्रीती मंधाना भारतीय महिला संघाची कर्णधार तर दिप्ती शर्मा उपकर्णधार असेल

हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्म्रीती मंधाना सांभाळले कर्णधारपदाची धुरा 

मुंबई : भारतीय महिला संघाचीआयर्लंड विरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून राजकोटमध्ये सुरु होणार आहे. या मालिकेसाठी  स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) भारतीय महिला संघाची कर्णधार तर दिप्ती शर्मा (Dipti Sharma) उपकर्णधार असेल. 
या मालिकेसाठी भारताने राघवी बिश्त आणि सायली सातघरे यांना संघात संधी दिली आहे. तर शेफाली वर्मा, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांना संघात स्थान मिळालेलं नाही. राघवी बिश्त भारताच्या टी 20 संघात पुनरागमन करणार आहे. तिने 2024 च्या डिसेंबर महिन्यात टी 20 मध्ये पदार्पण केलं होत. 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या प्रतिका रावळ आणि तनुजा कंवर यांची टी 20 संघात वर्णी लागली आहे.
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) अनुपस्थितीत स्म्रिती मंधानाला (Smriti Mandhana) यापूर्वीदेखील कर्णधारपदाची जबाबदारी ही दिली गेली आहे. स्म्रितीला (Smriti Mandhana) हरमनप्रीत कौरची  (Harmanpreet Kaur) उत्तराधिकारी म्हणून बघतलं जात आहे. 2024 च्या मार्च महिन्यात वूमेन्स प्रीमियर लीग (Women's Premier League)  जिंकून तिने आपली दावेदारी अजून मजबूत केली होती.  

सीनियर वूमेन्स एकदिवसीय ट्रॉफीमध्ये  (Senior Women's One-Day Trophy) 527 धावा करणाऱ्या शेफाली वर्माला भारतीय संघात स्थान  मिळालं नाही. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्दच्या मालिकांमध्ये सुद्धा तिला संघात स्थान मिळालं नव्हतं.  

भारतीय संघ -
स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावळ, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोश (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिश्त, मिनू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितास साधु, सायमा ठाकोर, सायली सातघरे.


सम्बन्धित सामग्री