Thursday, November 13, 2025 08:19:52 AM

IPL Auction 2026 : डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 साठीचा लिलाव?; खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत निश्चित

या लिलावापूर्वी फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत राखीव आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल.

ipl auction 2026  डिसेंबरमध्ये होणार ipl 2026 साठीचा लिलाव खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत निश्चित

IPL Auction 2026: इंडियन प्रीमियर लीग 2026 (आयपीएल) च्या हंगामासाठीचा मिनी-लिलाव डिसेंबरच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, लिलाव 13 ते 15 डिसेंबरदरम्यान पार पडू शकतो. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. या लिलावापूर्वी फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत राखीव आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. ही रिटेन्शन डेडलाइन अनेक मोठ्या निर्णयांना कारणीभूत ठरू शकते, कारण काही संघ आपल्या संघरचनेत सुधारणा करण्यासाठी निधी मोकळा करतील.  

हेही वाचा - Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जयस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले 7 वे शतक; 'या' दिग्गजांची केली बरोबरी

दरम्यान, 2025 मध्ये आयपीएल लिलाव सौदी अरेबियामध्ये झाला होता, जो पहिल्यांदाच भारताबाहेर आयोजित करण्यात आला होता. मात्र, 2026 चा मिनी-लिलाव भारतामध्येच होण्याची शक्यता अधिक आहे, कारण बीसीसीआयचे अधिकारी परदेशात पुन्हा आयोजन करण्यास उत्सुक नाहीत. या हंगामातील सर्वात मोठा बदल म्हणजे अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा संघातून बाहेर पडणे. त्यांनी अलीकडेच सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्यांच्या निवृत्तीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या खिशात 9.75 कोटी रुपये मोकळे होतील. हे पैसे आगामी लिलावात संघाला नव्याने आकार देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

हेही वाचा - Hardik Pandya Viral Video: एअरपोर्टवर हार्दिक पांड्याचा नवा अंदाज! गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबतचा व्हिडिओ व्हायरल

तथापी, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन हा या मिनी-लिलावातील सर्वाधिक मागणी असलेल्या खेळाडूंमध्ये असण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे मागील हंगामात न खेळलेला कॅमेरॉन आता पुनरागमन करण्यास सज्ज असून अनेक संघ त्याला मधल्या फळीत शक्तिशाली पर्याय आणि सीम-बॉलिंग ऑलराउंडर म्हणून घेण्यास उत्सुक आहेत. या मिनी-लिलावामुळे फ्रँचायझींना त्यांच्या मागील हंगामातील उणिवा भरून काढण्याची संधी मिळेल. तसेच, या ऑक्सनमुळे आणखी काही खेळाडूंना इतरत्र नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री