Tuesday, June 09, 2026 01:48:36 PM

IPL | मोहसीन खान ठरला आयपीएल 2026 मध्ये पहिल्या 5 विकेट्स घेणारा खेळाडू, जाणून घ्या इतर हंगामात कोणाच्या नावे हा विक्रम

मोहसीन खान ठरला आयपीएल 2026 मध्ये पहिल्या 5 विकेट्स घेणारा खेळाडू, जाणून घ्या इतर हंगामात कोणाच्या नावे हा विक्रम

ipl | मोहसीन खान ठरला आयपीएल 2026 मध्ये पहिल्या 5 विकेट्स घेणारा खेळाडू जाणून घ्या इतर हंगामात कोणाच्या नावे हा विक्रम

T20 क्रिकेटमध्ये फलंदाज सहजगत्या शंभर धावा करतात. 20 एप्रिल - 26 एप्रिल 2026 या काळात सहा फलंदाजांनी शतकं मारली. कोणी 50 बॉल्समध्ये, कोणी 40 तर कोणी 36 बॉल्समध्ये. छोटी मैदाने, चांगल्या बॅट्स आणि फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या यासर्व 'फॅक्टर्स'मुळे T20क्रिकेटमध्ये शतक मारणं सहज होत चाललंय, पण जेवढं सोपं शतक मारणं झालंय तेवढंच कठीण एका गोलंदाजासाठी पाच विकेट्स घेणं झालं आहे. आयपीएल 2026 मध्ये 27 एप्रिल 2026 पर्यंत 8 शतकं मारली आहेत पण एका इनिंग्समध्ये एका गोलंदाजाने एकदाच पाच विकेट्स घेतल्या आहेत. मोहसीन खानने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्य . आयपीएल 2026 मध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला, पण तुम्हाला आयपीएलच्या इतर हंगामात पहिला पाच विकेट्स घेणारा खेळाडू कोण आहे तुम्हाला माहीत आहे का ? असे आयपीएलचे हंगाम आहेत जिथे गोलंदाजांनी पाच विकेट्स घेतल्याच नाहीत. असे हंगाम कोणते आहेत ते देखील जाणून घेऊया.
 

हेही वाचा -Vaibhav Sooryavanshi Viral Video: ‘फोटो काढायचा असेल तर पैसे द्या...’ वैभव सूर्यवंशीची फॅन्सकडे अजब मागणी; चाहता म्हणाला, ‘2 फोटोचे 200 रुपये...’
 

2008 
आयपीएलमध्ये 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज होता पाकिस्तानचा सोहेल तन्वीर होता. राजस्थानकडून त्याने चेन्नईविरुद्ध 14 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. 

2009
भारताचा माजी कसोटी कर्णधार आणि महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने 2009च्या हंगामात पाच विकेट्स घेण्याचा शुभारंभ केला होता. आरसीबीकडून खेळताना त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध पाच धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. 

2011
2011 च्या हंगामातील पहिला पाच विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला लसिथ मलिंगा. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध १३ धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. 

2012 
चेन्नईकडून खेळताना रवींद्र जाडेजाने डेक्कन चार्जर्स विरुद्ध १६ धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. 2012 च्या हंगामातील पहिला गोलंदाज ठरला होता ज्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. 

2013 
2013 च्या हंगामात पहिला पाच विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता जेम्स फॉकनर त्याने 20 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या सामन्यात. 

2016
ऑस्ट्रेलियाचा ऍडम झाम्पाने एसआरएच विरुद्ध 19 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. 2016 च्या हंगामाचा पहिला पाच विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. तो या हंगामात पुणे या संघाकडून खेळत होता. 

2017 
2017 च्या आयपीएलमध्ये पहिला पाच विकेट्स घेण्याचा कारनामा ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टाय याने केला. तो गुजरात लायन्स संघाकडून खेळत असताना पुणे संघवाविरुद्ध त्याने १७ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या होत्या. 

2018 
उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूत ठरला होता 2018 च्या आयपीएल हंगामाचा पहिला पाच विकेट्स घेणारा गोलंदाज. पंजाबकडून खेळताना त्याने हैद्राबादविरुद्ध 14 धाव देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. 

2019 
अल्झारी जोसेफने त्याच्या आयपीएलच्या पदार्पणातच  12 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. मुंबईकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्ध  हा कारनामा केला. विशेष म्हणजे तो या हंगामातील पहिला गोलंदाज होता  ज्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या.  

हेही वाचा - Angkrish Raghuvanshi LSG vs KKR : आऊट की नॉटआऊट? बॅट आपटली, हेल्मेटही फेकून दिले; पंचांच्या निर्णयावर कोचसह केकेआरची टीम संतापली

2020 
केकेआरचा वरुण चक्रवर्ती 2020 च्या हंगामात पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 20 धावांत पाच खेळाडू बाद केले.

2021 
हर्षल पटेलने 2021च्या पहिल्याच सामन्यात 5 गडी बाद केले होते. आरसीबीकडून खेळताना त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. 

2022 
आयपीएलमध्ये सगळ्यात पहिली दोनशे विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता युझवेंद्र चहल आणि 2022 आयपीएल हंगामात पहिला पाच विकेट्स घेणारा गोलंदाजदेखील तोच होता. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 40 धावत 5 गडी बाद केलेले.

2023
इंग्लंडचा मार्क वूड होता 2023 च्या हंगामातील पहिला पाच विकेट्स घेणारा खेळाडू होता. त्याने लखनऊकडून खेळताना दिल्ली विरुद्ध 14 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. 

2024 
2024 मध्ये विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर याने गुजरात टायटन्स विरुद्ध 30 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत होता.  2024 च्या हंगामात  पाच विकेट्स घेण्याचा शुभारंभ यश ठाकूरने केला होता. 

2025 
2025 च्या हंगामात मिचेल स्टार्क याने दिल्लीकडून खेळताना 35 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. मिचेल स्टार्क 2025 च्या हंगामात पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.

2026
लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान ठरला पहिला गोलंदाज ज्याने आयपीएल 2026 मध्ये पाच विकेट्स घेतल्या. मोहसीनने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 23 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. 

 2010, 2014 आणि 2015 या हंगामात एकही गोलंदाजने पाच विकेत्या एका सामन्यात घेतल्या नाहीत. 
 


सम्बन्धित सामग्री