Angkrish Raghuvanshi LSG vs KKR : आऊट की नॉटआऊट? बॅट आपटली, हेल्मेटही फेकून दिले; पंचांच्या निर्णयावर कोचसह केकेआरची टीम संतापली

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता किंग्स रायडर्स या सामन्यादरम्यान केकेआरच्या फलंदाजीवेळी मोठा ड्रामा पाहायला मिळाला.

Angkrish Raghuvanshi LSG vs KKR : आऊट की नॉटआऊट? बॅट आपटली, हेल्मेटही फेकून दिले; पंचांच्या निर्णयावर कोचसह केकेआरची टीम संतापली

भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता किंग्स रायडर्स या सामन्यादरम्यान केकेआरच्या फलंदाजीवेळी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कोलकाताकडून फलंदाजी करणाऱ्या अंगकृष रघुवंशीच्या विकेटदरम्यान मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. प्रिंस यादवच्या गोलंदाजी वेळी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल रघुवंशीला बाद दिले. प्रिंस यादवच्या गोलंदाजीवेळी त्याने फेकलेल्या चौथ्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशी याने मिड-ऑनच्या दिशेने शॉट मारला आणि धाव घेण्यासाठी तो पुढे आला.

हेही वाचा- IPL 2026, KKR vs LSG: कोलकाताची सेना लखनौवर भारी! सामन्यात असं काय घडलं की, निकाल थेट सुपर ओव्हरमध्ये आला

मात्र नॉन स्ट्रायकर एन्डला उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीनने त्याला परत माघारी पाठवले. त्याचा इशारा आणि चेंडूच्या दिशेने पाहून रघुवंशी परत त्याच्या क्रीजच्या दिशेने जात होता. त्याचवेळेस क्रीजच्या दिशेने बॉल जाण्याच्या भीतीने त्याने डाईव्ह मारली. मात्र यावेळी मोहम्मद शमीने मारलेला थ्रो थेट रघुवंशीच्या अंगाला लागला. त्यामुळे लखनऊकडून मोहम्मद शमी आणि लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत यांनी ‘फील्डिंगमध्ये अडथळा’ आणल्याचे अपील केलं. अंपायरने थर्ड अंपायरकडे रिप्लेची मागणी असता.

यात रघुवंशीने बॉलला पाहून त्याची धावण्याची दिशा बदलली ज्यामुळे थ्रो स्टंपला न लागता त्याच्या अंगाला लागला. थर्ड अंपायरच्या या निष्कर्षनंतर मैदानी अंपायरने रघुवंशीला बाद घोषित केले. अंपायरच्या या निर्णयामुळे अंगक्रिश रघुवंशीसह संपूर्ण कोलकाता संघ संतापला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने रागाच्या भरात आपली बॅट जमिनीवर आपटली आणि हेल्मेट फेकून दिले. तर ड्वॅन ब्राव्हो आणि शेन वॉटसन डगआऊटमधून बाहेर आले. केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर देखील फोर्थ अंपायरसोबत संतापून बोलत होता. थ्रो केलेला बॉल स्टंपच्या दिशेने जात असेल आणि बॅटर मुद्दाम बॉलच्या मध्ये आला तर त्याला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड या नियमानुसार आऊट दिलं जातं.प्रशिक्षक अभिषेक नायर मैदानाच्या कडेला पंचांशी या निर्णयाबाबत चर्चा करताना दिसले. दरम्यान कोलकाताचा हा युवा फलंदाज मैदानात स्थिरावत असतानाच एका विचित्र पद्धतीने बाद झाला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number