मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला फाफ डू प्लेसीचा उत्तराधिकारी मिळालेला आहे. फाफ फाफ डू प्लेसीने 2022 ते 2024 या कालावधीत आरसीबीचं नेतृत्व केलं. 3 पैकी 2 हंगामात बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. तर, एका हंगामात आरसीबी 5 व्या स्थानावर राहिली होती.
आरसीसबीने आता रजत पाटीदारला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. याची 3 मुख्य करणे आहेत
वय -
रजत पाटीदार एक युवा खेळाडू आहे, पण त्याच्याकडे 10 वर्षाचा डोमेस्टिक क्रिकेटचा अनुभव आहे. बेंगुळूकडे कर्णधारपदाची 3 पर्याय होते रजत पाटीदार, विराट कोहली आणि कृणाल पंड्या. विराट कोहलीकडे कर्णधार पद जायच्या शक्यता जास्त होत्या. मात्र, विराट कोहलीने स्वतःच नकार दिल्याचे समजले. विराट त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. विराट कोहली हा बेंगळुरूसाठी भविष्याचा कर्णधारपदाचा पर्याय ठरू शकत नाही. विराट कोहलीचं वय आता 36 आहे. तर रजत पाटीदार 31 वर्षाचा आहे. त्याचसोबत कृणाल पंड्यादेखील एक पर्याय होता. रजत पेक्षा जास्त अनुभवी खेळाडूदेखील होता. पण, तोदेखील 34 वर्षाचा आहे. वय ही राजतसाठी जमेची बाजू होती. म्हणून त्याच्याकडे कर्णधारपदं सोपवण्यात आलं.
सय्यद मुश्ताक अली करंडक 2024/25 -
सय्यद मुश्ताक अली करंडक 2024/25 राजतने त्याच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश संघाला अंतिम फेरीत नेलं होत. साखळी फेरीत मध्य प्रदेश संघाने 7 पैकी 6 सामने जिंकले होते. मध्य प्रदेश 'अ' गटात प्रथम क्रमांकावर राहिला होता. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी राजतची कर्णधार म्हणून निवड केली होती. चंद्रकांत पंडित यांनी निवड केली म्हणजे राजतमध्ये नक्कीच काहीतरी गोष्ट असेल.
भारतीय खेळाडू -
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे विदेशी खेळाडूंना कर्णधार करणं हा देखील एक पर्याय होता. लिअम लिविंगस्टीन आणि फिल सॉल्ट हे दोन विदेशी खेळाडूंचा रूपात पर्याय होते. दोघांना मोठ्या पातळीवर नेतृत्व करण्याचा अनुभवदेखील होता. पण,आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूला कर्णधारपद देणं हे धोक्याचं ठरू शकतं. आयपीएलमध्ये एक संघ प्लेयिंग 11 मध्ये फक्त 4 च विदेशी खेळाडू खेळवू शकतो. त्यामुळे जर एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसेल त्याचसाठी इतर पर्यायी खेळाडूदेखील कमी असतात. आजवरच्या आयपीएलच्या इतिहासात फक्त ऍडम गिलक्रिस्ट, शेन वॉर्न आणि डेविड वॉर्नर हे हातावर मोजण्याएवढेच खेळाडू आयपीएलमध्ये यशस्वीपणे कर्णधारपद सांभाळू शकले आहेत.