मुंबई: आयपीएलमधील संघ गुजरात टायटन्स संघाचे मालकी हक्क लवकरच बदलणार आहेत. गुजरात टायटन्स हा संघ 3 वर्ष जुना संघ आहे. गुजरात संघाने 2022 चे आयपीएल पर्व जिंकले होते. तर 2023 मध्ये गुजरात आयपीएलचा उपविजेता संघ होता.
गुजरात टायटन्स हा संघ 2021 मध्ये इंग्लंडची कंपनी सीव्हीसी कॅपिटलने विकत घेतला होता. सीव्हीसी कॅपिटलने या संघाला खरेदी करण्यासाठी 5625 करोड एवढी किंमत मोजली होती. अहमदाबादचं नरेंद्र मोदी क्रिकेट ग्राउंड हे त्यांचं होम ग्राउंड आहे.
टोरेंट ग्रुपने गुजरात टायटन्सचे 67% मालकी हक्क विकत घेतले अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठी त्यांनी किती रुपये खर्च केले हे अद्याप तरी समोर आलेले नाही आहे. 2021 मध्येदेखील टोरेंट ग्रुपने गुजरात संघासाठी बोली लावली होती. त्यांनी गुजरात संघासाठी 4353 करोड तर लखनौ संघासाठी 4356 करोडची बोली केली होती. मलिकी हक्क विकत घेतल्याने संघाचा नावात आणि जर्सीमध्ये बदल येऊ शकतो.
टोरेंट ग्रुपच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या कंपनीची अंदाजे बाजारमूल्ये सुमारे ₹41,000 कोटी आहे आणि ती भारतातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक मानली जाते. टोरेंट पॉवर आणि टोरेंट फार्मा या दोन प्रमुख उपकंपन्या या समूहाचे नेतृत्व करतात. टोरेंट ग्रुपचे चेअरमन सुधीर मेहता यांचे सुपुत्र, जिनाल मेहता, आयपीएल गुंतवणुकीचे नेतृत्व करतील.
सध्या, सीव्हीसी कॅपिटलने विकलेला हिस्सा आणि त्याची किंमत यासंबंधी अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या अंतिम मान्यतेपूर्वी आवश्यक कागदपत्रे तपासली जात आहेत. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, गुजरात टायटन्सच्या नवीन मालकांची 2025 हंगामापासून म्हणजेच 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत अधिकृत सहभागाची शक्यता आहे.
गुजरातच्या संघात
शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कगिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सूथार, वॉशिंग्टन सुंदर, जेराल्ड कोएत्झी, अरशद खान, गुर्नूर ब्रार, शेर्फेन रुदरफोर्ड, साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जानत आणि कुलवंत खेजरोलिया हे खेळाडू आहेत.
हर्षित राणाच्या नावावर आगळा वेगळा विक्रम