Thursday, May 15, 2025 10:31:27 AM

हर्षित राणाच्या नावावर आगळा वेगळा विक्रम

भारत गेले 50 वर्ष एकदिवसीय सामने खेळात आहे. पण, असा विक्रम प्रथमच

हर्षित राणाच्या नावावर आगळा वेगळा विक्रम

मुंबई: भारताने इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 गडी राखून हरवलं. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंड संघ जास्त मोठी धावसंख्या करू शकला नाही. या सामन्यात हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. पदार्पणात उत्तम कामगिरी करत हर्षितने इंग्लंड संघाच्या फलंदाजीचा कणा तोडला. या कामगिरीमुळे हर्षित राणाच्या नावावर एक विक्रम नोंदला गेला आहे.  

हर्षित राणा भारतीय संघाचा प्रथम गोलंदाज ठरला आहे ज्याने पहिल्या टी 20 सामन्यात, एकदिवसीय सामन्यात आणि कसोटी सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. हर्षितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. उभा सामन्यात हर्षितने 117 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. त्याने इंग्लंड विरुद्ध टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले यात त्याने अनुक्रमे 33 धावा देऊन 3 आणि 53 धावा देऊन 3 गडी बाद केले. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.  

याचसोबत हर्षितच्या नावावर अजून एक विक्रम नावी झाला आहे. मात्र, हा विक्रम हर्षितला त्याच्या नावावर नसलेलाच त्याला आवडेल. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (टी 20 आणि एकदिवसीय) पदार्पणाच्या सामन्यात एका षटकात सार्वधिक धावा देण्याचा विक्रमदेखील त्याचा नावावर झाला आहे. त्याने एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. हर्षितकडून भारतीय संघाला आणि भारतीय चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. हर्षित एक उत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे आणि त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून बघितलं जातं.


indian airforce destroys 11 pak airbases in 23 minutes under operation sindoor mission
Operation Sindoor: भारतीय सैन्यदलाची धडाकेबाज कारवाई, 23 मिनिटांत पाकिस्तानचे 11 एअरबेस खाक

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अवघ्या 23 मिनिटांत भारतीय वायुदलाने पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले, कोणतीही हानी न होता कारवाई यशस्वी.

Jai Maharashtra News

operation sindoor भारतीय सैन्यदलाची धडाकेबाज कारवाई 23 मिनिटांत पाकिस्तानचे 11 एअरबेस खाक

नवी दिल्ली: भारतीय सैन्यदलाने नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्त हवाई मोहिमेची अधिकृत माहिती जाहीर केली असून, या कारवाईत भारतीय वायुदलाने अवघ्या 23 मिनिटांत पाकिस्तानातील 11 महत्त्वाचे एअरबेस बेचिराख केले. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही, ही बाब अत्यंत समाधानकारक आणि अभिमानास्पद आहे.

ही कारवाई पाकिस्तानच्या सीमेवर सुरू असलेल्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी करण्यात आली होती. या मोहिमेच्या वेळी पाकिस्तानमध्ये तैनात असलेली चिनी बनावटीची आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमदेखील निष्प्रभ ठरली. संपूर्ण कारवाईदरम्यान ही सिस्टीम जवळपास 23 मिनिटांपर्यंत ‘जॅम’ करण्यात आली होती, ज्यामुळे भारतीय विमानांना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Amazon, Flipkart, Etsy आणि इतर कंपन्यांना नोटीस बजावली

‘ऑपरेशन सिंदूर’ ही अतिशय काळजीपूर्वक आखलेली आणि यशस्वी पार पडलेली कारवाई ठरली आहे. भारतीय सैन्यदलांच्या योजनाबद्ध हालचाली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि अत्यंत जलद निर्णयक्षमतेमुळे हे यश शक्य झाले. या कारवाईने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर त्या देशात तैनात असलेल्या चिनी उपकरणांनाही मोठा धक्का दिला आहे.

भारतीय सैन्यदलाच्या या पराक्रमामुळे देशवासीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती अधिकृतपणे जाहीर करताना म्हटले की, ही केवळ एक नमुना कारवाई होती आणि भारत शांततेचा पुरस्कार करत असला तरी देशाच्या सुरक्षेला कुणीही आव्हान दिल्यास कठोर उत्तर देण्यास सक्षम आहे.

या कारवाईत वापरले गेलेले तंत्रज्ञान, सुस्पष्ट माहितीवर आधारित टार्गेटिंग आणि अचूक वेळी केलेली कारवाई यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या लष्करी क्षमतेची दखल घेतली जात आहे. देशाच्या हवाई सुरक्षेसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात असून भारतीय लष्कराचा हा पराक्रम देशाच्या शौर्यगाथेत सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

'ऑपरेशन सिंदूर' हे फक्त एक सैनिकी ऑपरेशन नव्हते, तर ते भारतीय सामर्थ्य, नियोजन आणि राष्ट्ररक्षणाच्या निर्धाराचे प्रतीक ठरले आहे.