मुंबई: भारतीय क्रिकेट बोर्ड हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड हा भारतीय खेळाडूंना चांगली वर्तवणूक तसेच उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी ओळखला जातो. पण, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिका आणि श्रीलंकाविरुद्दच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. यामुळे भारतीय खेळाडूंवर काही प्रतिबंध लागणार आहेत.
बीसीसीआयच्या नव्या धोरणाप्रमाणे कोणत्याही खेळाडूच्या परिवारातील सदस्य संपूर्ण दौरा संघासोबत राहू शकत नाही. जर दौरा 45 किंवा त्यापॆक्षा जास्त दिवसांचा असेल तर 2 आठवडे खेळाडूंच्या परिवारातील सदस्य त्यांच्यासोबत राहू शकतात. याचबरोबर, संघात असलेल्या सगळ्या खेळाडूंना टीम बसमधूनच प्रवास करावा लागेल. कोणताही खेळाडू सरावाला स्वतंत्रपणे फिरू शकत नाही. याचसोबत, बीसीसीआयने खेळाडूंना त्यांचे 'कमर्शिअल शूट' या दौऱ्याच्यानंतर कराव्या असेदेखील सांगितले आहे, अशी देखील सूत्रांची माहिती आहे.
त्याचप्रमाणे बीसीसीआय कामगिरीवर आधारित वेतनदेखील खेळाडूंना देण्याच्या विचारात आहे. सध्याच्या स्तिथीत खेळाडूंना 4 श्रेणीमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना एक निश्चित रक्कम दिली जाते .
भारतीय खेळाडूं हल्लीच्या काळात दुखापतीमुळे जास्त काळ खेळू शकले नाही. याचं उदाहरण म्हणजे मोहम्मद शमी. शमी 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर दुखापतीमुळे तो डिसेंबर 2024 पर्यंत डोमेस्टिक क्रिकेटदेखील खेळू शकला नव्हता.
यावर तोडगा म्हणून बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसवर भर द्यायचं ठरवलं आहे. यामुळे बीसीसीआय 'यो - यो' टेस्टदेखील पुन्हा खेळाडूंसाठी अनिवार्य करू शकते.
या सर्व गोष्टींमुळे खेळाडूंच्या आणि भारतीय संघाच्या कामगिरीवर कसा परिणाम होईल हे नक्कीच बघण्यायोग्य असेल.