Wednesday, February 12, 2025 03:27:06 AM

New Zealand vs Sri Lanka
मॅट हेनरीच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलँडची श्रीलंकेवर मात

न्यूझीलँडने श्रीलंका संघावर नऊ गडी राखून विजय मिळवला

मॅट हेनरीच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलँडची श्रीलंकेवर मात 

 

मुंबई: मॅट हेनरीच्या शानदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने श्रीलंकेला 178 धावांवर बाद केले. विल यंगच्या नाबाद 90 धावांमुळे 26.2 षटकांत हे लक्ष्य सहजपणे गाठले. न्यूझीलँडने श्रीलंका संघावर नऊ गडी राखून विजय मिळवला. बेसिन रिजर्वच्या पिचवर गोलंदाजांना मदत मिळत होती. या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी न्यूझीलँडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंका संघाने 2024 मध्ये 6 मालिकांपैकी 5 जिंकल्या. पण, त्यांना न्यूझीलँड देशातील परिस्थितीत संघर्ष करावा लागला. हेनरीने पथुम निसांका आणि कुसल मेंडिसला बाद केले, आणि सॅंटनरने कमिंदु मेंडिसला रन-आउट केला. श्रीलंकेचा संघ 23/4 अश्या खराब स्तिथीत आला. अविश्का फर्नांडो आणि जनिथ लियानागे यांनी 87 धावांची भागीदारी केली, पण सॅंटनरने लियानागेला बाद केले आणि फर्नांडो 56 धावांत बाद झाला. श्रीलंका संघ मात्र 178 करू शकला. 

न्यूझीलँडने प्रत्युत्तर देताना रचिन रवींद्र आणि विल यंग यांच्या फटकेबाजीमुळे जलद सुरुवात केली. रवींद्र 36 चेंडूत 45 धावा करून बाद झाला, पण यंगने 86 चेंडूत 90 धावा काढून सहज विजय मिळवला. 19 धावत 4 गडी बाद करणाऱ्या मॅट हेनरीला सामनावीर म्हणून घोषित केलं गेलं.

श्रीलंका 178/10 (43.4 षटकं) – (अविश्का फर्नांडो 56, मॅट हेनरी 4-19)
न्यूझीलँड 180/2 (26.2 षटकं) – (विल यंग 90*, रचिन रवींद्र 45) – न्यूझीलँड संघ 9 गडी राखून जिंकला.


सम्बन्धित सामग्री