Nitish Kumar Reddy | नितीश कुमार रेड्डीने रील बघून वाढवली गोलंदाजीची गती; 120 च्या गतीवरून थेट 140 वर उडी

नितीश कुमार रेड्डीने रील बघून वाढवली गोलंदाजीची गती; 120 च्या गतीवरून थेट 140 वर उडी

Nitish Kumar Reddy | नितीश कुमार रेड्डीने रील बघून वाढवली गोलंदाजीची गती; 120 च्या गतीवरून थेट 140 वर उडी

नितीश कुमार रेड्डीला अगदी कमी वेळात भारतीय क्रिकेटचा पुढचा स्टार असं म्हटलं जातं. मध्यक्रमात आक्रमक फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि मध्यम गती गोलंदाजी, त्याच्याकडे खेळात गरजेच्या असलेल्या तिन्ही कला आहेत. हेच नाही, तर क्रिकेटमध्ये आत्मविश्वास आणि तो मानसिकदृष्ट्यादेखील कणखर आहे. नितीश कुमार रेड्डीच्या फलंदाजीवर कोणालाच शंका नव्हती. पण त्याच्या गोलंदाजीवर बरेच प्रश्न उपस्थित केले जायचे आणि हे वारंवार उपस्थित केले जायचे. 
त्याला 1-2 विकेट्स घेण्याएवढाच गोलंदाज म्हटलं जायचं. आता त्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळेल असं दिसतंय. त्याने त्याच्या गोलंदाजीचा वेग 120 किमी प्रति तास वरून 140 किमी प्रति तासच्या आसपास वाढवला, तेही इंस्टाग्राम रील्सच्या मदतीने. त्याने हे कसं साध्य केलं, जाणून घेऊया.

हेही वाचा –Mumbai Indians | एकही T20 सामना न खेळता माजी भाजपा मंत्र्यांचा नातू मुंबई इंडियन्समध्ये, कोण आहे 'हा' खेळाडू?

फेब्रुवारी 2026 मध्ये नितीश कुमार रेड्डी इंस्टाग्रामवर रील्स  बघत होता. त्याच्या इंस्टाग्रामच्या 'फीड'मध्ये माजी क्रिकेटपटू आणि 'हाय परफॉर्मन्स' प्रशिक्षक स्टीफन जोन्सचे वेगवान गोलंदाजीविषयी प्रशिक्षण देतानाचे व्हिडिओ आले. नितीशला त्याचे व्हिडिओ  आवडले. नितीशचा इंस्टाग्रामचा 'अल्गोरिदम' अजून त्याला स्टीफनचे आणखी व्हिडिओ सुचवू लागला. त्यानंतर नितीशने स्टीफनच्या मॅनेजरशी संवाद साधला. यानंतर स्टीफनने नितीशला प्रशिक्षण देण्यासाठी भारतात यायचं ठरवलं, पण त्याच्याआधी त्याने नितीशच्या गोलंदाजीबाबत राहुल द्रविड आणि जुबीन भरूचा विचारणं योग्य समजलं, कारण स्टीफन जेव्हा राजस्थानचा प्रशिक्षक होता तेव्हा या दोघांबरोबर काम केलेलं आणि मुख्य म्हणजे त्याने नितीशला जास्त गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं. स्टीफनने नितीशबाबतीत बरीचशी माहिती या दोघांकडूनगोळा केली आणि बंगळूरुच्या 'पादूकोण-द्रविड सेंटर ऑफ एक्ससेलन्स' येथे एका आठवड्याच्या सर्व सत्रांचे नियोजन केले.

हेही वाचा – RCB Team Winning Strategy | विराट कोहली असूनही सतत हार; पण 'या' व्यक्तींमुळे संपला ट्रॉफीचा दुष्काळ 

नितीश कुमार रेड्डीने स्टीफनकडे दोन मुख्य विनंत्या केल्या. पहिली की 'मी माझ्या फिटनेसवर पूर्वीपेक्षा जास्त भर द्यायला लागलो तरीही माझ्या गोलंदाजीची गती वाढत नाही' आहे आणि दुसरी आयपीएल 2026च्या आधी 'मला माझ्या गोलंदाजीत असलेल्या समस्या दूर करून दे'. यानंतर स्टीफन जोन्स याने नितीश कुमार रेड्डीचे जुने गोलंदाजीचे  व्हिडिओ बघितले आणि त्याने मॅथ्यू हेडन नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीबाबत बोलत असतानाचा व्हिडिओ पाहिला.
पहिले त्याने नितीशची फिटनेस टेस्ट केली, त्यानंतर तो त्याच्या सरावाकडे वळला आणि त्याच्या तांत्रिक गोलंदाजीतील तांत्रिक बिघाड दूर केले. एका आठवड्याच्या सरावानंतर त्याची गतीदेखील वाढली आणि नितीशच्या गोलंदाजीतल्या त्रुटीदेखील दूर झाल्या. आयपीएल सुरू झाल्यावर नितीशने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजी प्रशिक्षकांसोबत म्हणजे वरुण एरॉनसोबत सराव केला. आयपीएलमध्ये त्याच्या कष्टाची फळं दिसू लागली. वेग 120 किमीच्या गतीने गोलंदाजी टाकणार नितीश कुमार रेड्डीने 139 किमी प्रति तासाच्या गतीने बॉल टाकला तेव्हा सगळेच चकित झाले.

स्टीफन जोन्स हा इंग्लंडचा खेळाडू होता. तो इंग्लंडसाठी कधी खेळू शकला नाही, मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 387 आणि 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये 256 विकेट्स घेतल्या. स्टीफन जोन्सने नितीश कुमार रेड्डीच्या आधी शॉन टेट, स्टुअर्ट ब्रॉड, डॅनिअल क्रिस्टियन, जोफ्रा आर्चर यांच्यासोबत काम केलं, तर त्याने इशांत शर्मा, वरुण एरॉन, जयदेव उनाडकट आणि शिखा पांडे यांच्या गोलंदाजीची गेलेली गती पुन्हा आणण्यास मदत केली.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number