चंदीगढ: Punjab Kings ने Lucknow Super Giants ला 54 धावांनी पराभूत करत IPL 2026 मधील आणखी एक दमदार विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 254 धावा केल्या, जो या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर ठरला. याआधी हा विक्रम Royal Challengers Bengaluru च्या 250 धावांच्या नावावर होता.
पंजाबच्या डावात प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली यांनी लखनऊच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. प्रियांशने अवघ्या 37 चेंडूंमध्ये 93 धावांची वादळी खेळी केली, तर कूपरने 46 चेंडूंमध्ये 87 धावा फटकावल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी करत पंजाबला भक्कम स्थितीत पोहोचवले. ही भागीदारी पंजाबच्या IPL इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारींपैकी एक ठरली.
हेही वाचा: IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! आयुष म्हात्रे इतके दिवस मैदानाबाहेर; चेन्नईच्या अडचणीत भर
255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने आक्रमक सुरुवात केली होती. मिचेल मार्श आणि आयुष बडोनी यांनी पॉवरप्लेमध्ये 61 धावा मिळवल्या. मार्शने 40, बडोनीने 35 आणि कर्णधार ऋषभ पंत ने 23 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी केली. शेवटी एडन मार्करम ने 22 चेंडूंमध्ये 42 धावा करत झुंज दिली, मात्र त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली.
BREATHTAKING. BRUTAL. BRILLIANT. ?️ Priyansh Arya is the Player of the Match for his phenomenal 93 (37)! ? Relive his knock ? https://t.co/TQpWfDHNYB#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvLSG | @PunjabKingsIPL pic.twitter.com/kTQWfK2yRD — IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
लखनऊची धावगती बराच वेळ 10 च्या आसपास कायम होती. 10 षटकांत संघाने 102 धावा केल्या होत्या आणि सामना अजूनही सहज वाटत होता. मात्र मधल्या षटकांत विकेट्स पडत राहिल्या आणि मोठे फटके मारण्याचा वेग कमी झाला. 13 व्या षटकानंतर आवश्यक धावगती झपाट्याने वाढली आणि त्यानंतर लखनऊला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. अखेरीस संघ 20 षटकांत 200 धावांपर्यंतच पोहोचू शकला.
या विजयासह पंजाबने गुणतालिकेतील त्यांचे वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली यांची जोडी आता IPL 2026 मधील सर्वात आक्रमक फलंदाज जोड्यांपैकी एक मानली जात आहे.