मुंबई: रिलायन्स ग्रुपचे संघ विश्वभर आहेत. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीनंतर आता इंग्लंडमध्येदेखील रिलायन्स ग्रुपने संघ खरेदी केला आहे. रिलायन्स ग्रुपने विकत घेतलेले सर्व सहा संघानी त्यांचादेशातील लीगमध्ये विजेतेपद पटकावले आहे. सातवा संघ जो रिलायन्स ग्रुपने घेतला आहे तो देखील विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे.
रिलायन्स ग्रुपने इंग्लंडच्या 'द हंड्रेड' 'लीग'मधील 'Oval Invincibles' संघाचे 49% मालकी हक्क विकत घेतले आहेत. 2026 पासून 'Surrey County Cricket Club' आणि 'रिलायन्स ग्रुप'मधील भागेदारी सुरु होणार आहे. 'Oval Invincibles' हे इंग्लंड आणि 'वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB)' द्वारेविकला गेलेला पहिला 'हंड्रेड' संघ ठरला असून, त्याची किंमत अंदाजे 123 दशलक्ष पौंड एवढी ठरवण्यात आली आहे. या मूल्यमापनाच्या 49% हिस्स्याचा अर्थ असा की, रिलायन्सला या भागासाठी सुमारे 60 दशलक्ष पौंड भरावे लागणार आहेत. रिलायन्सला मुख्यतः 'लंडन स्पिरिट्स' हा संघ विकत घेणार होते. मात्र, 'सिलिकॉन व्हॅली तंत्रज्ञान संघटनेने' हा संघ 293 मिलियन युरो मोजून हा संघ खरेदी केला.
गुजरात टायटन्सला मिळणार नवीन संघ मालक
पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सना सर्वात बलशाली आयपीएल फ्रँचायझी म्हणून ओळखले जाते, तर 'Surrey County Cricket Club' हा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत 'काउंटी क्लब' आहे. 'Oval Invincibles'चे पुरुष आणि महिला संघ रिलायन्स सोबत संबंधित असलेले सहावे आणि सातवे संघ बनतील. याआधी मुंबई इंडियन्स (आयपीएल आणि डब्ल्यूपीएल दोन्हीमध्ये), एमआय न्यूयॉर्क (MLC), एमआय केपटाउन (SA20) आणि एमआय एमिराट्स (ILT20) हे संघ रिलायन्सच्या मालकीचे आहेत.
नुकत्याच झालेल्या 'SA T20 ' मध्ये रिलायन्स ग्रुपच्या 'MI Cape Town' संघाने विजेतेपद पटकावले होते. या संघाचे नेतृत्व अफगाणिस्थानचा रशीद खान करत होता.